Pradip Kand and Chandrakant Patil  Sarkarnama
पुणे

आमदारकीचा योग? चंद्रकांतदादा बनले ज्योतिषी अन् पाहिला प्रदीप कंद यांचा हात!

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी चंद्रकांत पाटील नेहमीच करत असतात.

गणेश कोरे

पुणे : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तीन महिन्यांत कोसळेल, सहा महिन्यांत कोसळेल, अशी भविष्यवाणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नेहमीच करत असतात. सरकारला अडीच वर्ष होत आले तरी ते पडलेले नाही. यातच आता चंद्रकात पाटील यांनी चक्क भविष्य पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पुणे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीप कंद (Pradip Kand) यांचा हात पाहून भविष्यात त्यांची कामगिरी अजून चांगली असेल. अशी भविष्यवाणी वर्तविली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) निवडणुकीत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे भाजपकडून विजयी झाले. त्यांच्या सत्कार समारंभात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंद यांच्या हातावरील भविष्यरेषा पाहून भविष्यात अजून चांगली कामगिरी असेल, अशी भविष्यवाणी केली. खुद्द प्रदेशाध्यक्षांनी भविष्यवाणी वर्तविली असल्याने कंद आता आमदार होतात का? याची राजकीय वतुर्ळात चर्चा आहे.

शिरुर विधानसभा मतदारसंघातून प्रदीप कंद हे विधानसभेसाठी इच्छुक होते. यासाठीच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांना तिकिटापासून वंचित रहावे लागले होते. आमदार नाही तर किमान जिल्हा बँकेचे संचालकपद कंद यांना मिळाले असले, तरी यामागे राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छुपी ताकद असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. असे असले तरी आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी कंद यांचा हात पाहून भविष्यवाणी वर्तविल्याने ती खरी ठरणार कि, खोटी हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT