आर्यन खानला जामीन मिळवून देणारे रोहतगी उतरले नितेश राणेंसाठी मैदानात

शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत.
Nitesh Rane and Mukul Rohatgi
Nitesh Rane and Mukul RohatgiSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. यावर राणेंनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे राणेंच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohtagi) हे बाजू मांडत आहेत. याच रोहतगींनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळवून दिला होता.

रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली होती. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला पकडले होते. त्यानंतर तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने रोहतगी यांनी बाजू मांडली होती. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती.

आता हेच रोहतगी राणेंची बाजू मांडत आहेत. आर्यनला जामीन मिळवून देण्यात रोहतगी यशस्वी झाले होते. आता राणेंना या प्रकरणात ते दिलासा मिळवून देतात का हे पाहावे लागणार आहे. मात्र. रोहतगी हे राणेंच्या बाजूने मैदानात उतरल्याने आतापासूनच याची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. राणेंच्या वतीने आधी उच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांऐवजी रोहतगींची निवड करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामागे राणेंची अटक टाळण्यासाठी आता केवळ सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव शिल्लक आहे हेही कारण आहे. (Mukul Rohatgi appears for Nitesh Rane)

Nitesh Rane and Mukul Rohatgi
मोठी घडामोड : नितेश राणे सर्वोच्च न्यायालयात; सरन्यायाधीशांसमोर होणार सुनावणी

राणे यांनी आता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला आहे. सुरवातीला राणे यांचा अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेले राणे काल (ता.24) प्रथमच कणकवली पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यांची सुमारे पाऊण तास कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती. (Nitesh Rane Case Updates)

Nitesh Rane and Mukul Rohatgi
अखेर ठरलं! माजी मुख्यमंत्री राणे विरुद्ध सूनबाई अशीच लढत

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) निवडणूक प्रचारामध्ये शिवसेनेचे प्रचारक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील दोन्ही बाजूचे युक्तीवाद 13 जानेवारीला पूर्ण झाला होता. नंतर 17 जानेवारीला उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी मनीष दळवी यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com