Ashwini Jagtap, Devendra Fadnavis. Sarkarnama
पुणे

Ashwini Jagtap : 'तुतारी' हाती घेणार असल्याची चर्चा, भाजप आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या,'पक्ष सोडून जाणं...'

Deepak Kulkarni

Pimpri Chinchwad News: चिंचवड मतदारसंघाच्या भाजप आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप लवकर तुतारी हाती घेणार असल्याची चर्च राजकीय वर्तुळात सुरू आहे.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांशी संपर्क केल्याचीही चर्चा आहे.त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

एकीकडे शरद पवार गटातील पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असतानाच आमदार अश्विनी जगताप यांनी मात्र मौन धारण केलं होतं. त्यामुळे संशयाचं धुकं आणखी दाट झालं होतं.अशातच आता आमदार अश्विनी जगतापांनी पक्षप्रवेशाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनी जगताप यांनी भाजप (BJP) सोडणार असल्याच्या चर्चा या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, माझ्या पक्षांतराच्या बातम्या खोट्या असून कोणीतरी हे वावटळ उठवलं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच पक्षप्रवेशाच्या चर्चांना विरोधकांकडून खतपाणी घातलं जात आहे.पण माझ्या पतीच्या निधनानंतर भाजपनं माझ्यावर विश्वास ठेवून मला चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि निवडूनही आणलं आहे असंही जगताप यांनी सांगितलं.

अश्विनी जगताप म्हणाल्या, मला निवडून आणण्याच्या माध्यमातून त्यांनी माझ्या पतीला श्रद्धांजली वाहिली. ते आणि देवेंद्रजी खूप चांगले मित्र होते.देवेंद्रजी या भागात आल्यानंतर नेहमी आमच्या घरी यायचे. त्यामुळे पक्ष सोडून जाणं हे माझ्या डोक्यात अजिबात नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.

चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप कमळाला सोडचिठ्ठी देत लवकरच 20 नगरसेवकांना सोबत घेऊन तुतारी फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे भाऊ आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत निर्णय झाला असल्याचीही चर्चा सुरू आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप लढण्यास उत्सुक आहे.

भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळीच शंकर जगतापांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्नही केले होते.तसेच अश्विनी जगतापांना त्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शंकर जगताप काही तासांसाठी नॉट रिचेबलही झाले होते.त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT