Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांना अडविण्याची धमकी देणाऱ्या पवारांना जशास तसे उत्तर देण्याचा अमोल शिंदेंचा इशारा....

Dispute In Solapur Maratha community : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण लांबणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सोलापूरमध्ये आल्यानंतर आम्ही देणार आहोत, असे दास शेळके यांनी सांगितले.
Mauli Pawar-Amol Shinde
Mauli Pawar-Amol ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 September : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे येत्या बुधवारी (ता. २५ सप्टेंबर) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी सोलापूरमध्ये येत आहेत. मात्र, मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून मराठा समाजातील दुसऱ्या गटाने माऊली पवारांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे अमोल शिंदे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण लांबणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सोलापूरमध्ये आल्यानंतर आम्ही देणार आहोत, असे मराठा समाजाचे दास शेळके यांनी या वेळी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांना उत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहिण योजनेचा सोलापूरमधील कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी माऊली पवारांनी (Mauli Pawar) दिला होता. त्याला अमोल शिंदे यांनी आज उत्तर दिले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, अशी मागणी या वेळी मराठा समाजाच्या नेत्यांनी केली आहे.

Mauli Pawar-Amol Shinde
Shikhar Paharia : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाच्या उमेदवारीबाबत कुटुंबीयांनी दिली मोठी अपडेट....

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी सोलापूरला येत आहेत. सोलापुरात त्यांना पाय ठेवू देणार नाही, अशी वल्गना माऊली पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या महाविकास आघाडीच्या स्थानिक तरुणांनी केली आहे. मराठा समाजाचे काही कार्यकर्ते हे काँग्रेस पुढाऱ्यांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचा अजेंडा राबवत आहेत, असाही आरोप अमोल शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री हे महिलांच्या कार्यक्रमासाठी येत आाहेत. त्यांना अडवण्याची भाषा कोणी करत असेल, तर सोलापूरमधील महिला भगिनी हे कदापि सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना माऊली पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवूनच दाखवावे. त्यांना महिलाच उत्तर देतील. आम्ही कार्यकर्तेही सज्ज आहोत, असे आव्हान अमोल शिंदे यांनी दिले आहे.

भाजपच्या आजी माजी पालकमंत्र्यांकडून कामं करून घेण्यासाठी अशी स्टंटबाजी केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नावाखाली काही लोकांची दुकानदारी सुरू आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

Mauli Pawar-Amol Shinde
Maharashtra Political Appointments : एसटी महामंडळ अध्यक्षपदाच्या टायमिंगवर भरत गोगवले नाराज; म्हणाले, ‘हे पद लवकर मिळाले असते तर...’

‘पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊ नये’

मुख्यमंत्र्यांना माऊली पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवूनच दाखवावे. केवळ घोषणा करायच्या आणि अटक करून घ्यायची, असा या मागचा प्रसिद्धी स्टंट करण्याचा हेतू आहे. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊ नये. मोकळे ठेवावे. जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे आवाहन अमोल शिंदे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com