Mukta Tilak Sarkarnama
पुणे

मोठी बातमी : आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

Pune News : गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाले आहे. त्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी ३. ३० च्या दरम्यान, अखेरचा श्वास घेतला.

कसबा मतदार संघात त्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्या आधी पुण्याच्या अडीच वर्ष महापौर होत्या. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मुक्ता टिळक यांना भाजपकडून पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून 2002, 2007, 2012 आणि 2017 मध्ये निवडणून गेल्या होत्या. भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा, स्थायी समितीच्या सदस्या, तसेच पक्षाच्या शहर उपाध्यक्षा म्हणुनही त्यांनी काम केले होते. त्याच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचे वय ५८ वर्ष होते.

भाजप संघटनेमध्ये त्यांनी विविध पदे भुषवली होती. दरम्यानच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी चर्चा झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT