Sushant Singh Rajput case : स्वत: रियानेच सांगितले होते कोण आहे 'AU'! मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल!

Sushant Singh Rajput case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला आहे.
Rhea Chakraborty, Aditya Thackeray
Rhea Chakraborty, Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sushant Singh Rajput case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी बुधवारी लोकसभेत सुशांतच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे ४४ वेळा फोन आला होता, आसा दावा केला. यावरून सध्या राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे.

रियाच्या मोबाईलवर फोन आलेली AU ही व्यक्ती नेमकी कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना खुद्द रियानेच याबाबच केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या रिया चक्रवर्तीच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सरदेसाईंनी आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप होत असल्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर रिया चक्रवर्तीने AU नेमक कोण आहे, याचे स्पष्ट उत्तर दिले होते.

Rhea Chakraborty, Aditya Thackeray
Disha Salian Case : आदित्य ठाकरेंची अडचण वाढणार; दिशा सॅलियन आत्महत्याप्रकऱणाची SIT मार्फत चौकशी होणार

जेव्हा मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा तपास हटवण्याची मागणी केली जाते, तेव्हा पोलीस दबावाखाली असल्याचे सांगितले जाते. नेमका पोलिसांवर कुणाचा दबाव आहे? असा प्रश्न रियाला विचारण्यात आला होता. यावर रिया म्हणाली होती, या सगळ्या चर्चांचे उत्तर माझ्याकडे नाही. माझ्यावर होत असलेल्या आरोपांपैकी तो एक आरोप आहे. माझी एक मैत्रीण आहे, अनाया उदास तिचा मोबईल नंबर माझ्या फोनमध्ये AU नावाने सेव्ह आहे. मात्र, सगळे म्हणतात त्याचा अर्थ आदित्य उद्धव आहे. यावर खुद्द अनायाने सुद्धा स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही सुद्धा स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, वारंवार हे म्हटले जाते की ते आदित्य ठाकरे आहेत' असे स्पष्ट उत्तर रियाने दिले होते.

Rhea Chakraborty, Aditya Thackeray
Maharashtra Assembly Live : आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या राहुल शेवाळेंची SIT चौकशी होणार

दरम्यान, आदित्य ठाकरेंना मी आजपर्यंत कधीच भेटले नाही. माझे त्यांच्याशी कधीच बोलणेही झालेले नाही. माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही. मला कुणीही संरक्षण देत नाही. मी तर म्हणते आहे मला कुणीतरी संरक्षण द्या' असे रियाने या मुलाखतीमध्ये सांगितले होते. शिवसेना नेत्या संजना घाडी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. दरम्यान, या प्रकरणावरून सत्ताधारी भाजपने रान उठवले आहे. AU म्हणजे आदित्य ठाकरेच असल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने राहुल शेवाळेंनी लोकसभेत केला होता. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com