Maharashtra Politics news  Sarkarnama
पुणे

Prasad Lad News : रोहित पवारांना अजितदादा योग्य वेळी उत्तर देतील; आमदार प्रसाद लाडांनी फटकारले, टीआरपी वाढवण्यासाठी...

Maharashtra Politics : प्रसाद लाड यांनी पवारांना डिवचलं...

Mangesh Mahale

Lonavala : "भाजपचा विचार स्वीकारून राष्ट्रवादीतील दुसरा गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरीत केला होता. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर रोहित यांनी अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या निशाण्यावर भाजपचे नेतेही आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रोहित पवारांना फटकारले.

"रोहित पवार हे काल-परवा राजकारणात आले आहे. टीआरपी वाढवण्यासाठी राष्ट्रवादीत आता स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी टीका करण्याचं काम आता रोहित पवार करीत आहेत. रोहित पवार यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही योग्य वेळ आल्यानंतर अजितदादा त्यांना उत्तर देईल," अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी पवारांना डिवचलं आहे. ते लोणावळा येथे माध्यमांशी बोलत होते.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चेवर प्रसाद लाड म्हणाले, "मंत्रिमंडळाचा विस्ताराची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीनच नेते सांगू शकतात. याव्यतिरिक्त कोणताही नेता बोलला तरी ते व्यर्थ आहे. मुख्यमंत्रीच हा निर्णय घेऊ शकतात,"

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पवार अधिक सक्रिय झाले आहेत. कार्यक्रम, सभामधून ते अजित पवार गटात गेलेल्या नेत्यावर तुटून पडतात. त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम अजित पवार गटाकडून होत आहेत. त्यामुळेच "रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे," अशी खोचक टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

रोहित पवारांवर दोन दिवासांपूर्वी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी गंभीर आरोप केला आहे. भाजपसोबत जाण्याचा आग्रह सर्वप्रथम रोहित पवारांचा होता. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टर्मचे आमदारांनी शरद पवारांची भेट घेऊन भाजपसोबत जाण्यास विनंती केली असल्याचा आरोप सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर केला आहे.

त्यावर सुनील शेळके यांचा आरोप हे हास्यास्पद आहे. पूर्ण विधान ऐकलं नाही. त्यामुळे यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. सत्तेसाठी पवार साहेबांच्या जवळचे नेते तिकडे गेले त्यांनी दगा दिला. त्यामुळे आम्ही आता संघर्षाची भूमिका घेतली असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT