Crime News Sarkarnama
पुणे

Pune Crime News : पुण्यातील भाजप आमदाराच्या मामाचं भर चौकातून अपहरण; हडपसर पोलीस चौकीत गुन्हा दाखल

BJP MLA Relative Kidnapped in Pune : पुण्यातील भर दिवसा वर्दळीच्या चौकातून अपहरणकर्त्यांनी भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण केले.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात खुनाच्या 6 घटना पुण्यामध्ये घडल्या आहेत. अशातच आता एक अपहरणाची घटना घडल्याने पुणे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. पुण्यातील भर दिवसा वर्दळीच्या चौकातून अपहरणकर्त्यांनी भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण केले.

भाजपचे (Bjp) विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे सोमवारी अपहरण करण्यात आले. अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव सतीश वाघ असे आहे. सतीश वाघ हे चौकात उभे असताना चार चाकी गाडीतून आलेल्या चौघानी त्यांना जबरदस्ती गाडीत बसून अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले असताना चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यांनी जबरदस्तीने सतीश वाघ यांना गाडीत बसवून पोबारा केला. ही गाडी सोलापूरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

दरम्यान, याबाबत सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत असून गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर होत चालला आहे. कोयता गॅंग, खुनाच्या वाढलेल्या घटना आणि पब संस्कृती आणि ड्रग्सचा सुळसुळाट यामुळे सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT