Mahayuti Government : महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार तारेवरची कसरत; मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटपाकडे लक्ष

Mahayuti Government Expansion : भाजप व शिवसेना शिंदे गटात गृहमंत्री पदावरून चुरस आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार करीत असताना सर्वच घटक पक्षाचे समाधान करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Eknath Shind Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

विशेषतः भाजप व शिवसेना शिंदे गटात गृहमंत्री पदावरून चुरस आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार करीत असताना सर्वच घटक पक्षाचे समाधान करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मंत्रिपदासाठी असलेल्या अनेक इच्छुकांचे महायुती समाधान कसे करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे दिली जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे महायुतीमधील भाजप, शिवसेना (Shivsena) शिंदे गट, अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच पहावयास मिळत आहे. महायुतीमधील तीन पक्षांमधील इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वांचे समाधान करण्यासाठी नेतेमंडळीना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Rahul Narvekar: बाळासाहेब भारदे यांच्यानंतर दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर कोण?

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विधिमंडळाचे विशेष अधिवेशनाचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. तर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे विस्ताराची लगबग सुरु आहे.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Indapur News : इंदापुरात डीजेच्या दणदणाटात ‘ईव्हीएम’ची घोड्यावरून काढली मिरवणूक

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अंतिम होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (NCP) बैठक करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रविवारी रात्री 12 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या जागांबाबत चर्चा केली. सोमवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चांगली खाती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Sharad Pawar: मारकडवाडीत शरद पवार कडाडले, 'बॅलेटवर मतदान घ्या, निवडणूक पद्धत बदला' VIDEO पाहा

एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपने त्याला नकार दिला होता. मात्र, शिवसेनेने गृहमंत्रिपदाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रि‍पदे येण्याची शक्यता आहे. भाजपकडून गृहखात्याऐवजी महसूल खाते शिवसेनेसाठी सोडले जाईल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता यावर काय तोडगा काढला जाणार याची उत्सुकता लागली आहे.

Eknath Shind Devendra Fadnavis Ajit Pawar
Sharad Pawar Markadwadi Tour : पवारांच्या दौऱ्यात होणार ‘लाँग मार्च’चे प्लॅनिंग; राहुल गांधींसह केजरीवाल, बॅनर्जी, अखिलेश, ठाकरेही येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com