Sakal-Saam survey Sarkarnama
पुणे

Sakal-Saam survey : भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के लोकांचा कौल; पण अजितदादांच्या बंडानंतरही शरद पवार गटाला १५ टक्के जनतेची पसंती

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रवादी NEXT- Sakal saam Survey : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणावर राज्यातील जनतेचे मत आजमावण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने एक सर्व्हे केला. त्यात विधानसभेच्या आगामी २०२४ च्या निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाला मतदान कराल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी भाजपला २६. ८ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या स्थानावर आर्श्चयकारकरित्या काँग्रेस पक्ष आलेला दिसून येत आहे. (BJP most preferred; But after Ajit Dada's rebellion, Sharad Pawar group is preferred by 15 percent of people)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर सकाळ माध्यम समूहाने राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघात आणि ४८ लोकसभा मतदारसंघातील ७३ हजार ३३० लोकांचा कल जाणून घेण्यात आलेला आहे. त्यात राज्यातील जनतेला आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला मतदान करणार असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यात भाजपच्या (BJP) बाजूने २६.८ टक्के मतदारांनी कल दिला आहे.

या सर्व्हेत काँग्रेस (Congress) पक्ष दुसऱ्या स्थानावर आलेला आहे. काँग्रेसला राज्यातील १९.९ टक्के जनतेने पसंती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीचा फायदा काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता दिसून येत आहे.

काँग्रेसनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला १४.९ टक्के लोकांनी कल दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या फुटीनंतरसुद्धा शरद पवार गट आपली ताकद बऱ्यापैकी राखणार असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र ५.७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटालाही १२. ७ टक्क जनतेने पसंती दिली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ४.९ टक्के लोकांचा कौल मिळाला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २.८ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीला २.८ टक्के लोकांचा कल दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT