Sakal-Saam Survey : मूळ पक्षात वेगळा गट करुन सत्तेत सहभागी होण्याचा नवीन फंडा मान्य आहे का? मतदारांच्या उत्तराने आमदारांचे टेन्शन वाढले!

Sakal-Saam Survey News : राज्यातील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'ने सर्व्हे केला आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Sakal -Saam Ncp Survey : राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्य सरकारमध्ये भाजप (BJP), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'ने महासर्व्हे केला आहे. त्या माध्यमातून मतदारांचा कल जाणून घेतला आहे.

'सकाळ साम'ने केलेल्या सर्वेक्षणात 74 हजार 330 मतदारांची भूमिका जाणून घेतली आहे. यात विविध पक्षांना मतदान करणाऱ्या विविध वयोगटातील मतदारांचा सहभाग आहे. तसेच ५० टक्के महिलांसह सर्व जाती-धर्मांच्या मतदारांचाही समावेश आहे. यासह विविध व्यवसाय, नोकरी करणाऱ्या आणि आर्थिक स्थितीचाही विचार करण्यात आला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Vasant More News : वसंत मोरेंची थेट अजितदादांकडे मागणी; 'जरा आता आमचाही विचार करा की'

या सर्व्हेसाठी 'सकाळ' माध्यम समूहातील राज्यातील कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन लोकांकडून राजकीय स्थितीबाबत उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत. या मध्ये मतदारांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Rahul Gandhi News : राहुल गांधींना शेवटची आशा; गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

या सर्व्हेमध्ये मतदारांना प्रश्न विचारण्यात आला होता की, मुळ पक्षात वेगळा गट करुन सत्तेत सहभागी होण्याचा नवीन पायंडा मतदार म्हणून आपल्याला मान्य आहे का? या प्रश्नावर 80.9 टक्के मतदारांनी नाही, असे उत्तर दिले आहे. तर 19.1 टक्के मतदारांनी हो असे उत्तर दिले आहे. त्यामुळे मुळ पक्ष सोडून सत्तेत सहभागी होणाऱ्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com