Vasant More Sarkarnama
पुणे

Vasant More: थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यायला हरकत नाही, पण त्यापूर्वी..., उद्धव ठाकरेंच्या नेत्यानं खासदारांना दिला सल्ला

Pune Railway Station Renaming Bajirao Peshwa Name: पुण्यातील दोन खासदारांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाबतच्या असुविधांवर काम करणे आवश्यक असताना फक्त अशा प्रकारचे नावांचे प्रस्ताव दिले जात आहेत. हे दुर्दैवी आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावं, अशी मागणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरातून विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी देखील या नामांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वसंत मोरे म्हणाले, "राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एका बैठकीमध्ये पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला देण्याचा प्रस्ताव द्यायला हरकत नाही. मात्र त्या पुणे रेल्वे स्टेशनवर आत्तापर्यंत ज्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अनेक मुली त्या रेल्वे स्थानकावरून गायब झाले आहेत. याकडे आधी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं वसंत मोरे म्हणाले.

वसंत मोरे पुढे म्हणाले, काही दिवसापूर्वी आम्ही या रेल्वे स्थानकावर एसआरपीएफच्या जवानाकडून एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला होता त्या विरोधात आंदोलन केलं होतं. तसेच 130 कोटी पुणे रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षा यंत्रणाच्या दुरुस्तीसाठी आल्या असताना देखील त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत आंदोलन केलं होतं.

त्यामुळे या पुणे शहरांमध्ये सहा आमदार आणि दोन भाजपच्या खासदार असताना या रेल्वे स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीकडे, सुरक्षा यंत्रणे कडे दुर्लक्ष होत आहे. पुण्यातील दोन खासदारांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाबतच्या असुविधांवर काम करणे आवश्यक असताना फक्त अशा प्रकारचे नावांचे प्रस्ताव दिले जात आहेत. हे दुर्दैवी आहे.

आता देखील पुणे रेल्वे स्टेशनवर घडलेल्या दुर्दैवी घटनाबाबत सातत्याने बातम्या येत असतात त्यामुळे जर या पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे असं नाव दिलं तर थोरला बाजीराव पेशवे रेल्वे स्थानकावर बलात्कार झाला, मुलींची छेड काढली गेली, मुलींना पळून नेलं गेलं अशा पद्धतीच्या बातम्या आल्या तर ते चालणार आहेत का? असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला.

त्यामुळे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मेघा कुलकर्णी यांनी सर्वप्रथम या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या प्रस्ताव देण्यात त्यांनी विचार करावा तसेच या ठिकाणी सर्वप्रथम रेल्वे स्थानकांच्या सुधारणांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचं वसंत मोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT