Murlidhar Mohol  Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol NCP offer : मुरलीधर मोहोळांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर; काय आहे, भन्नाट किस्सा...

Murlidhar Mohol Reveals NCP Offer Story in Talegaon Pune : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आमने-सामने आहेत.

Sudesh Mitkar

Pune political news : सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीची चर्चा आहे. कारण या निवडणुकीमध्ये एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणुकीत उतरले आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ रिंगणात आहेत. महायुतीमधील मित्र पक्षातील हे दोन नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने ठाकल्याने ही निवडणूक अधिकच रंजक झाली आहे.

या निवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस कडून पक्षप्रवेशाची ऑफर आली होती असे सांगितले आहे. त्याबाबतचा किस्सा देखील त्यांनी मावळ मधील एका कार्यक्रमात सांगितला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीबाबतचा किस्सा सांगितला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, "2019च्या विधानसभा निवडणुकी (Election) वेळेचा एक किस्सा आहे. जो सुनील शेळके आणि मलाच माहिती आहे. 2019ला जेव्हा विधानसभा निवडणूक लागली, त्यावेळेस सुनील शेळके आणि मी दोघेही भाजपमध्ये होतो. त्यावेळी मावळमधून उमेदवारी मिळावी, यासाठी सुनील शेळके हे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना जेव्हा समजलं की भाजपमधून आपल्याला तिकीट मिळू शकत नाही, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली."

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील शेळके यांनी पहिला फोन मला केला आणि म्हणाले, माझी उमेदवारी कट झाली, मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आणि आता मला उमेदवारी मिळाली तुमची ही कोथरूडमधून उमेदवारी कट झाली आहे. त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील माझ्यासोबत राष्ट्रवादीमध्ये चला, अशी ऑफर आपल्याला सुनील शेळके यांनी दिल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

मोहोळ पुढे म्हणाले, "मात्र मी त्यांना सांगितलं की, मी दिल्या घरी सुखी आहे आणि तुम्ही देखील भाजप सोडून जाऊ नका असं सुनील शेळके यांनी सांगितलं. त्यावर त्यांनी मी आता परतीचे दोर कापले आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं भलं झालं. आणि मी भाजपमध्येच राहिलो आणि माझं देखील भलं झालं."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT