Pune News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेते गेल्या दहा वर्षात सरकारने कोणत्या कोणत्या योजना राबवल्या याची माहिती देत मतदारांना पुन्हा आपल्यालाच विजयी करा, असे आवाहन करीत आहेत. तर विरोधी पक्षांचे नेते सत्ताधारी पक्ष कसे चुकीचे काम करत आहे, या सरकारने महागाई बेरोजगारी हे प्रश्न प्रलंबित कसे ठेवले याकडे लक्ष वेधत या सरकारला धडा शिकवा, अशी साद मतदारांना घालत आहेत.
भाजपच्या पुणे (BJP Pune) लोकसभा बूथ प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी डीपी रोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे झाली. बैठकीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक (Brajesh Pathak) पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात शेतकरी छोटे विक्रेते युवक महिला अशा समाजातील विविध घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत,'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'मोदींनी सर्वच क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधकांची अनामत रक्कम जप्त करण्यासाठीची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलो येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा,' असे आवाहन पाठक यांनी कार्यकर्त्यांना केले.
जलजीवन मिशन राबवून मोदींनी घरोघर पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. सौभाग्य योजनेतून गरिबांना वीज उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला. सावकाराच्या पाशातून मुक्त केले. आयुष्मान भारत योजना लागू केली. त्यांना सन्मानाने जगण्याची हमी दिली. राम मंदिर बनविले, कलम 370 हटवले, मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाक कायदा केला, अशा अनेक योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरू केल्या. याची संपूर्ण माहिती मतदारांपर्यंत पोहोचून मोदी यांना पुन्हा निवडून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आली आहे, असेही पाठक म्हणाले.
देशात मोदींना पर्याय नाही. ही वस्तुस्थिती असली तरी आपल्याला क श्रेणीतील बूथ वर मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मिळालेले मताधिक्य आणि त्यानंतर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे घटलेले मताधिक्य यांचा विचार गंभीरपणे करावा लागेल, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून लोकसभेत विजय मिळविता येईल. मात्र त्यासाठी सर्वांना खूप कष्ट करावे लागतील, असेही मोहोळ म्हणाले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.