Vasant More  Sarkarnama
पुणे

BJP On Vasant More : पुण्यात 'ड्रोन शो'चा वाद चिघळला; ...तर भाजप वसंत मोरेंचा सत्कार शनिवार वाड्यावर ठेवणार अन् बक्षीसही देणार!

Vasant More Allegations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ड्रोन शो चे आयोजन करण्यात आले होते. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आयोजनावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे

Sudesh Mitkar

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ड्रोन शो चे आयोजन करण्यात आले होते. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आयोजनावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचा आरोप ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी केला आहे. वसंत मोरे यांनी केलेला आरोप भाजपच्या चांगले जिव्हारी लागले आहेत. या आरोपानंतर भाजपचे शहरातील नेते आणि भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुशील मेंगडे यांनी वसंत मोरे यांच्यावर टीका करत थेट महापालिका जिंकण्याचं आव्हानच दिलं आहे.

वसंत मोरे काय म्हणाले होते..?

वसंत मोरे म्हणाले ,परवा दिवशी पुण्यात ड्रोन शो झाला.आपण म्हटलं कंपनीला विचारावं किती खर्च येतो कंपनीने हे कोटेशन दिले आहे. 1000 ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी एक कोटी रुपये. एवढा खर्च करण्यात आला तसंच या कार्यक्रमासाठी इतर देखील खर्च होता त्यामुळे कोट्यवधी रुपये या कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आले.

या एक कोटी रुपयेमध्ये आमच्या पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती काम झाले असते तेव्हा हवेत उडणाऱ्यांनी थोडं जमिनीवरही लक्ष द्यावं..., अन्यथा महापालिका निवडणुकीमध्ये पुणेकर नागरिक तुम्हाला आसमान दाखवतील अशी टीका वसंत मोरे यांनी केली होती.

भाजपाकडून (BJP) वसंत मोरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहेत. याबाबत सुशील मेंगडे म्हणाले, वसंत मोरे यांचं राजकारण म्हणजे सरळ सरळ अपयशाची शिडी आहे. लोकसभेत उमेदवारी मिळाली तर डिपॉझिट जप्त, आमदारकीचं स्वप्न पाहिलंस पण तेही फसलं. स्वतःच्या पराभवांचा ढीग लपवता येत नाही म्हणून सोशल मीडियावर मोठ्या गप्पा मारून स्वतःला नेता समजणं हा त्यांचा छंद झाला आहे.

ड्रोन शो हा महाराष्ट्रातला पहिला, पुण्याचा अभिमान आणि हजारो पुणेकरांनी आनंद घेतलेला उपक्रम. देशभरातून त्याचं कौतुक झालं, पुण्याचं नाव उंचावलं. पण मोरे यांचया सारख्यांचा फक्त जळफळाटच झाला आहे.

वसंत मोरे यांनी पुणेकरांचा विश्वास जिंकून दाखवाव्यात, आणि मग कधी मोठमोठ्या उपदेशांच्या गोष्टी कराव्यात. यानिमित्ताने एक आव्हान देतो या वेळेला पुणे महानगरपालिका निवडणुकीत जिंकून दाखव. आम्ही तुमचा शनिवारवाड्यावर 11 रुपये रोख देऊन सत्कार करू असं मेंगडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT