
New Delhi News: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर क्रिकेटमधील आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यांवरुन राजकारण ढवळून निघालं होतं. यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लेही चढवण्यात आले.
याचदरम्यान, पाकिस्तान विरूद्धच्या दुसर्या सामन्यात साहिबजादा फरहान अर्धशतकानंतर बॅट एके 47सारखी पकडली. अगदी दहशतवादी खांद्यावर ठेवून हवेत गोळीबार करतात तसंच अॅक्शन केली. यामुळे मोठा वाद पेटला असतानाच आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत धक्कादायक विधान केलं आहे.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोरोक्कोत पाकव्याप्त काश्मीरबद्दल केलेल्या नव्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आपण जगभरात कुठेही असलो तरी आपण भारतीय आहोत हे विसरून चालणार नाही. भारतीय असल्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत असंही म्हटलं. तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) बदललेल्या भारताच्या भूमिकेवरही वक्तव्य केलं आहे.
एकीकडे ऑपरेशन सिंदूरवरुन विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत अडचणीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची चालून आलेली संधी मोदी सरकारनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे घालवल्याचा आरोपही विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला.
पण आता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोन दिवसांच्या मोरोक्कोच्या दौऱ्यावर दरम्यान पाकव्याप्त काश्मीरवर मोठं भाष्य केलं. ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी काश्मीर खोऱ्यात गेलो होतो. त्यावेळी मी पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून त्यावर ताबा मिळवण्याची गरज नाही. मुळात तो भाग आपलाच आहे आणि तो लवकरच भारतात समाविष्ट होईल असल्याची आठवण त्यांनी सांगितली.
तसेच एक दिवस पीओके स्वतःच म्हणेल, मी सुद्धा भारत आहे. तो दिवस फार दूर नाही असा दावाही राजनाथ सिंह यांनी केला आहे. त्यांनी पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल. त्या भागात राहणाऱ्या लोकांमधून आता तशी मागणी होत असल्याचं विधानही केलं आहे.
सिंह म्हणाले, तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या घोषणा ऐकल्या असतील. पाच वर्षांपूर्वी मी भारतीय लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी काश्मीर खोऱ्यात गेलो होतो. त्या कार्यक्रमावेळी भाषण करत असताना मी म्हटलं होतं की पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी हल्ला करण्याची किंवा युध्दाची गरज नाही,असा दावाही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी केला.
भारताचे संरक्षण मंत्री पहिल्यांदाच मोरक्कोच्या भेटीसाठी गेले आहेत. या दौऱ्यात ते त्यांच्या हस्ते तेथील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन केले जाणार आहेत. हा आफ्रिकेतील पहिलाच भारतीय संरक्षण उत्पादन कारखाना असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू साहिबजादा फरहान यानं अर्धशतकानंतर बॅट एके 47 सारखी धरत अगदी दहशतवादी खांद्यावर ठेवून हवेत गोळीबार करतात तशी कृती केल्याचा आरोप करत मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याच्या या सेलिब्रेशननंतर भारतीय चाहते आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.