Pune News : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.23) मतदान पार पडले. एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान झाले आहे. त्यामुळे हे मतदान भाजपला तारणार की झटका देणार यावरून भाजप समर्थकांची धडधड वाढली आहे.
पुणे पदवीधरसाठी एकुण 62.76 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान सोलापूर जिल्ह्यातून 71.43 टक्के झाले आहे. तर, सातारा जिल्ह्यातून 66.94 टक्के मतदान झाले आहे. तर, पुणे जिल्ह्यातून 61.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात कमी मतदान हे सांगली जिल्ह्यातून झाले आहे. अवघे 55.51 टक्के मतदान सांगलीत झाले आहे.पुणे पदवीधरसाठी एकुण दोन लाख 43 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये एकुण मतदानाची टक्केवारी हे 85.86 टक्के आहे. तब्बल 53 हजार 184 शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक 89.39 टक्के मतदान झाले आहे. तर, सोलापूरमधून 89 टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातून सर्वात कमी 78.08 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पदवीधरमध्ये मतदानात सर्वात मागे असलेल्या सांगली जिल्ह्यातून शिक्षकसाठी 87.83 टक्के मतदान झाले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. सचिन सानप हे अपक्ष लढत आहे. त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पाठींबा दिला आहे. पुण्यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे सानप हे भाजपचा खेळ बिघडवणार का? अशी चर्चा आहे. तर, जयंत असगावकर हे सलग दोनवेळा विजयी झाले आहे. त्यांना तिसऱ्यांदा विजय मिळवता येणार की भाजपच उमेदवार बाजी मारणार याची देखील उत्सुकता आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार कोणाची मते खाणार यावर निवडणुकीचा कल अवलंबून असल्याची देखील चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.