MLC Election : पुणे 'शिक्षक'साठी पसंती दोनचा खेळ, तर 'पदवीधर'मध्ये महायुतीचा 'गेम'..? 'एक्झिट पोल'चा खळबळजनक अंदाज समोर

Pune Teacher And Graduate Election 2026: पुणे पदवीधरची ही निवडणूक प्रामुख्याने 47 उमेदवारांमध्ये पार पडली. मात्र, महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेला उमेदवार महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता एक्झिट पोलमधून समोर येत आहे.
Pune MLC Election
Pune MLC ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या आणि वारसदारांच्या मुद्द्यांवर चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मोठ्या चुरशीची लढत पाहायला मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक आर्थिकसह विविध मुद्द्यांवर चांगलीच गाजली आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक विजयाचा कौल कुणाच्या पारड्यात टाकणार? याकडे पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, 'साम' टीव्हीच्या 'एक्झिट पोल'च्या अंदाजात धक्कादायक अपडेट समोर येत आहे.

पुणे पदवीधरची ही निवडणूक प्रामुख्याने 47 उमेदवारांमध्ये पार पडली. मात्र, महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेला उमेदवार महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता एक्झिट पोलमधून समोर येत आहे. महायुतीकडून डॉ. स्मिता जाधव, महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनील मोदी यांच्यात प्रमुख लढत झाली. पश्चिम महाराष्ट्रातील एका नामवंत वृत्तपत्राच्या समूहातील जाधव या उमेदवार असल्यामुळे साहजिकच त्यांच्याविरोधात उघडपणे प्रचार करण्याची अडचण महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली.

मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी घेतलेल्या भूमिकेचा पुणे आणि सातारा जिल्ह्यात मोठा परिणाम उमटू शकतो. शिवाय कोल्हापूर सांगली आणि सातारामध्ये नेत्यांची फौज असली तरी बहुतांश हा कौल महाविकास आघाडीच्या देशमुख यांच्याकडेच झुकल्याचं बोललं जात आहे.

परिणामी कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निकालाचा प्रभाव जास्त दिसून येतो. सांगली आणि कोल्हापूरमधून महायुतीतून डावलेले शरद लाड भैय्या माने यांच्यासारखे इच्छुक प्रामाणिक राबले असले तरी परिणामी त्यांना मानणाऱ्या मतदारांमध्ये महायुती संदर्भात नाराजी असल्याचे चित्र आहे.

Pune MLC Election
MLC Election 2026: मराठवाडा पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटलांना धक्का की चव्हाणांचा विजयी चौकार ? 'एक्झिट पोल'चा अंदाज समोर

काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या जाधव या भाची असल्या तरी आमदार पाटील यांनी माझे करिअर देखील महत्त्वाचे असल्याचे सांगत देशमुख यांच्या प्रचारात आघाडी घेतली. त्यामुळे साहाजिकच सतेज पाटील हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सांगलीत देखील काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. मात्र, शेवटच्या टप्प्यांत ही निवडणूक आर्थिक बाजूला झुकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात नेमका कौल कुणाला मिळणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, 'साम'च्या एक्सिट पोलनुसार महाविकास आघाडीला कौल मिळेल अशी शक्यता आहे.

पुणे शिक्षकमध्ये ही निवडणूक महायुतीमधील घटक पक्षांच्या प्रतिष्ठेची बनली. भाजपकडून विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे, शिवसेनेकडून सचिन सानप, राष्ट्रीय समाज पक्षाकडून माजी आमदार दत्तात्रय सावंत तर महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यात प्रमुख लढत झाली. पुण्यातून सानप यांची आघाडी दिसत असली तरी भाजप कडून गावडे यांच्यासाठी प्रयत्न झालेत. साताऱ्यात जयंत असगावकर यांची आघाडी तर गावडे दुसऱ्या स्थानी राहतील.

Pune MLC Election
Maharashtra MLC election News : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुती, महाविकास आघाडीत 'टफ फाईट'! बंडखोर कोणाचा 'गेम' बिघडवणार; 'एक्झिट पोल'चा धक्कादायक अंदाज समोर

सोलापूर, सांगलीमध्ये असगावकर,सावंत यांच्यात टक्कर आहे. तर कोल्हापूरमध्ये असगावकर, गावडे व सानप यांच्यात टक्कर असेल. मंगेश चिवटे यांना डावलून सानप मधून शिवसेनेने दिलेली उमेदवारी, शिवाय मैत्रीपूर्ण लढतीत भाजपला बसलेला फटका आणि भाजपचे नेते माजी आमदार दत्ता सावंत यांचा बसणारा फटका, याचा थेट फायदा काँग्रेस उमेदवारांना बसू शकतो.

मात्र, पहिल्या पसंतीवर कोणालाच निर्णयक मत मिळतील याचा अंदाज लावता येणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे कदाचित दुसऱ्या पसंतीवर शिक्षक मधील निकाल अवलंबून असेल. त्यामुळे भाजप व काँग्रेस 50-50% आहे. पण अखेरच्या दिवशी शिवसेना आणि भाजपकडून लक्ष्मी आशीर्वाद दिल्याने शिक्षकमधील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांंनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com