Pune, 11 January : भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांना पुन्हा एकदा पदरात घ्यावं. मागील काळात त्यांनी ज्या काही चुका केल्या आहेत. त्या चुकांना माफी देऊन बाळाभाऊंना पुन्हा एकदा संधी द्यावी. या मताचा मी आजतरी आहे, अशी गुगली राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी टाकली आहे.
भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात बंड करत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीच्या काळात भेगडेंनी आमदार शेळकेंवर सडकून टीका केली होती. त्यासंदर्भात मावळच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना भेगडेंच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आला हेाता. त्यावर बाळा भेगडे यांचे प्रकरण शिस्तभंग समितीकडे पाठविण्यात येईल, असे उत्तर दिले होते.
बावनकुळेंच्या उत्तरावर आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी प्रतिक्रिया देताना बाळा भेगडेंना भाजपने माफ करावं, असं विधान केले आहे. ते म्हणाले, बाळाभाऊ भेगडे यांनी २०१९ ला जी चूक केली, तीच चूक त्यांनी पुन्हा २०२४ मध्येही केली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना मग त्या महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील. अथवा आगामी २०२९ मधील संभाव्य विधानसभा आणि लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये ते पुन्हा चूक करणार नाहीत, असा मला विश्वास आहे.
भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. त्या पक्षात आदेशाला आणि विचारालाही महत्व असतं. भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विचार आणि शिस्तीला मानणारा आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी काही परिस्थिती निर्माण झाली हेाती किंवा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जो काही निर्णय घेतला होता, असे सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.
आमदार शेळके म्हणाले, बाळा भेगडे यांच्या त्या निर्णयाच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. खरं तर ती वेळ ही कुठल्याही राजकीय कार्यक्रमाची नव्हती. बावनकुळे हे कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला आलेले नव्हते. एका व्यावसायिक कार्यक्रमासाठी ते आले होते. सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळेंना विचाला होता.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते अजितदादा पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी एक निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर तुम्हाला कसं वाटतंय, तसं निवडणुकीला सामोरे जा. पण, महायुतीचाच झेंडा कसा फडकेल, हे बघा. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत म्हणजे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेवर आपल्या विचारांचा झेंडा कसा फडकेल, त्या अनुषंगाने रणनीती आखली पाहिजे, असे शेळके यांनी म्हटले आहे.
मावळात महायुतीच्या नेत्यांचा मेळावा घेणार
आगामी काळात आम्ही मावळात महायुती म्हणून एक मेळावा आयोजित करणार आहोत. त्या मेळाव्याला सर्वांना निमंत्रित करायचं. त्यातून महायुतीलमधील राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षातील प्रमुख नेत्यांना बोलावून निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.