BJP Political News Sarkarnama
पुणे

Pune BJP State Executive Meeting: पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; इच्छुकांची जोरदार 'बॅनरबाजी'

J.P. Nadda News : लोकसभा, विधानसभेसह महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचा 'मेगा प्लान' ठरणार?

सरकारनामा ब्यूरो

Pune News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर भाजपनं आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी(दि.१७) मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर आता नड्डा हे पुण्यातही भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील भाजप(BJP) कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पुणे भाजपकडून बॅनर्स लावून जय्यत तयारी केली आहे. मात्र, बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील बॅनरबाजीमुळे शहराचं विद्रुपीकरण होत असल्याची जोरदार टीका करण्यात येत आहे.

पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज (दि.१८) बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. याच धर्तीवर बालगंधर्वबाहेर पुणे भाजपकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच आत बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

केंद्रातील मोदी सरकार(Modi Government)ला पूर्ण झालेली नऊ वर्ष, केंद्राच्या योजनांचा प्रचार यासह आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभर घटनात्मक कार्यक्रम राबविण्यासाठी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात आज बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

दिवसभरात तीन बैठका होणार आहेत. प्रदेश कार्यकारिणीला नड्डा हे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत. तसेच बालगंधर्वपासूनच जवळ असलेल्या घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडोटेरियममध्ये आमदार, खासदारांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर मंत्रीगटाची स्वतंत्र बैठक जे. पी. नड्डा घेणार आहेत.

मागील काही महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहे. यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. यावरुन भाजपनं लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकण्याच्या ध्येयानं जय्यत तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे.

फडणवीसांचे निवडणुकांबाबत मोठे संकेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका या ऑक्टोबर,नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात असं मोठं विधान पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT