BJP News: मुंबई महापालिका निवडणुकीची भाजपची रणनीती ठरली?; जे.पी.नड्डांनी पदाधिकाऱ्यांना दिला 'हा' कानमंत्र

J. P. Nadda News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
J P Nadda News
J P Nadda NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने देखील भाजप रणनीती आखत आहे. यातच जे.पी.नड्डा मुंबईत दौऱ्यावर असून त्यांनी आज भाजपा मोर्चा आघाडीची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काही कानमंत्र दिले आहेत.

J P Nadda News
Pune Anti-Encroachment Operation: अतिक्रमण विरोधी कारवाई करताना सुरक्षारक्षकाला मारहाण; पाच जण अटकेत

"केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर इतरांना जोडण्याचं कामं करा. तुमच्या परिसरातील लोकांना भेटा, असं सांगत सरकारचं काम जनतेपर्यंत पोहचवा", असं आवाहन जे.पी.नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

जे.पी.नड्डा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात निवडणूक तयारीचा आणि राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.

J P Nadda News
DK Shivakumar News : कर्नाटकचा तिढा कायम; डी. के. शिवकुमारांनी पक्षासमोर ठेवली 'ही' अट

दरम्यान, भाजपची गुरुवारी (दि.18 मे) पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते, आमदार, खासदार यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आता पुण्यातील बैठकीत काय रणनीती ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com