पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आज पुण्यात राडा झाला. सोमय्या जम्बो कोविड सेंटरमधील भ्रट्राचाराची चौकशी व्हावी यासाठी तक्रार देण्यासाठी आले होते. ते महापालिकेत जात असताना शिवसेनेच्या (ShivSena) कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. त्यावेळी झालेल्या झटापटीत ते खाली पडले. त्यावरुन भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, सध्या गुंडाराज आहे. आज किरीट सोमय्यांना मारण्याची पूर्ण तयारी झाली होती. त्यांना ठार मारण्याचा हेतू होता, असा आरोपही पाटील यांनी केला. सोमय्यांवर हल्ला करून काही होणार नाही. काय करत होते पोलिस? आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती, असेही पाटील म्हणाले.
पुणे पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करावा. आम्ही स्वस्थ बसणार नाही. शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये ते गेले तेव्हा सगळे स्थानिक नेते कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. निषेध करायला शब्द बोथट आहेत. त्यांची माझी या संदर्भात चर्चा झाली. सोमय्यांची तब्येत स्थिर आहे. असे पाटील यांनी सांगितले. सोमय्या यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी तिथे भाजपचे कार्यकर्ते का नव्हेत असा प्रश्ना पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, तिकडे महापालिकेत हे असे होणार आहे कुणाला माहीत होते. भाजप आमदार नितेश राणेंच्या बाबतीत सुडबुडदबीने वागणे चालले आहे. आम्ही कायदा पाळतो, सरकार अजूनही कायदा पाळत नाही. आम्ही घाबरत नाही. आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार चालणार, असेही पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, झटापटीच्या घटनेनंतर सोमय्या संचेती रुग्णालयात गेले. तेथे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पाटील गेले होते. यानंतर त्यांनी सोमय्या यांना भेटल्याचा फोटोही ट्वीट केला आहे. त्यामध्ये सोमय्या यांच्या हाताला दुखापत झाली असल्याचे दिसत आहे. पाटील ट्वीट करत म्हणाले, सोमय्या यांच्यावर आज पुण्यात शिवसेनेकडून प्राणघातक हल्ला झाला. परमेश्वर कृपेने या हल्ल्यातून किरीटजी बचावले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची भेट घेऊन विचारपूस केली, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.