किरीट सोमय्यांवरील हल्यानंतर फडणवीसांचा शिवसेनेला इशारा...

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
 devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आज पुण्यात राडा झाला. सोमय्या जम्बो कोविड सेंटरमधील भ्रट्राचाराची चौकशी व्हावी यासाठी तक्रार देण्यासाठी आले होते. ते महापालिकेत जात असताना शिवसेनेच्या (ShivSena) कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. त्यावेळी झालेल्या झटापटीत ते खाली पडले. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

या संदर्भात फडणवीस यांनी ट्वीट केले. त्यामध्ये ते म्हणाले ''राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!'' अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

 devendra fadnavis
शिवसैनिकांशी झटापट; किरीट सोमय्या पळता पळता पडले

दरम्यान, सोमय्या यांनी कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर ते पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, याच वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. सोमय्या महापालिकेत पोहचताच तिथे आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली. शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीसमोर लोटांगण घालत अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ झाला होता.

सोमय्या महापालिकेत जात असताना शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले. मात्र, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. सुरक्षा रक्षक कार्यकर्त्यांना बाजूला करत असताना सोमय्याच महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. यानंतर सोमय्या यांना महापालिकेच्या आवारातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांवर सौम्य लाठीचार्ज केला.

 devendra fadnavis
सोमय्या म्हणाले, 'शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला'

लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या सेंटरमध्ये कोरोना काळात अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांच्या मृत्यूला रुग्णालयाचे व्यवस्थापन कारणीभूत आहे. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीला कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले. सुजित पाटकर यांची ही कंपनी आहे. याप्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणांकडून कामात कसूर झाल्याचे दिसत आहे, असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com