BJP Health Camp  Sarkarnama
पुणे

BJP Political News : भाजप १४ ऑगस्ट हा 'फाळणी वेदना दिन' म्हणून पाळणार; 'त्या' कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करणार

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad : भारताची १४ ऑगस्ट १९४७ ला फाळणी झाली. पाकिस्तान वेगळा झाला. त्यामुळे १४ ऑगस्ट हा भाजप 'फाळणी वेदना दिन' म्हणून पाळणार आहे. यादिवशी मशाल मोर्चे काढण्यात येऊन फाळणीच्या हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करणार आहे.

देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस ‘विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना) स्मृती दिवस’ पाळण्याचा संकल्प भाजप(BJP)ने केला आहे. देशाच्या विभाजनाच्या वेदनांचे स्मरण ठेवून फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे मुख्यप्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत आज केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहराध्यक्ष धीरज घाटे(Dheeraj Ghate) उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना त्यासाठी बलिदान दिलेल्यांचे स्मरण ठेवलेच पाहिजे, असे उपाध्ये म्हणाले.देशाची फाळणी ही धार्मिक आधारावर झालेल्या विश्वासघाताची कहाणी आहे,अशी भाजपची धारणा असल्याचे ते खेदाने म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वी २० फेब्रुवारी १९४७ या दिवशी ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट एटली यांनी स्वातंत्र्याचा निर्णय जाहीर केला.

३० जून १९४८ पूर्वी सत्तेचे हस्तांतरण करून देश सोडण्याचे ब्रिटीशांनी जाहीर केले. मात्र, त्याआधी त्यांनी देशाची फाळणी केली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही, असेही केशव उपाध्ये(Keshav Upadhye) म्हणाले.

फाळणीच्या हिंसाचारात सव्वा कोटी नागरिकांना रस्त्यावर यावे लागले. ६० लाख बिगर मुस्लिमांनी पश्चिम पाकिस्तानातील आपली घरेदारे सोडून भारतात पळ काढला.तर २० लाख बिगर मुस्लिमांनी पूर्व पाकिस्तानातून (आताचा बांगलादेश) घरेदारे सोडून भारतात स्थलांतर केले. या प्रक्रियेत पाच लाखांहून अधिक नागरिकांची हत्या झाली.हा आकडा दहा लाखांहून अधिक अशी माहिती उपाध्ये यांनी यावेळी दिली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT