Pune Crime News: पुण्यातील देहू रोड (Dehu Road) परिसरात मंगळवारी एका भाजप कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्याने देहू रोड परिसरात तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थति नियंत्रणाखाली आहे.
गांधीनगरमधील रहिवासी रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, रमेश रेड्डी यांचा लहान भाऊ वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीने मारला गेला होता.
मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता रेड्डी हे पंडित जवाहरलाल नेहरु मंगल कार्यालय परिसरात एका टेलरच्या दुकानात मित्रांसोबत गेले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक रेड्डी यांच्यावर अचानक बेछूट गोळीबार केला.
हल्लेखोरांनी रमेश रेड्डी यांच्या हात, पाठ आणि डोक्यात तब्बल ९ गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. मित्रांनी त्यांना तातडीने एका रुग्णालयात येथे दाखल केले, मात्र अतिरक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेतील सर्वात भीषण बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी रमेश रेड्डी यांचा सख्खा भाऊ जॉन रेड्डी याचाही अशाच प्रकारे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आता पुन्हा त्याच कुटुंबावर हल्ला होत मोठ्या भावाचाही जीव घेतल्याने ही केवळ हत्या नसून ‘टार्गेट किलिंग’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर देहूरोडमध्ये संतापाची लाट उसळली. नातेवाईक आणि स्थानिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. काही काळ मुंबई-पुणे महामार्गही रोखण्यात आला.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.
रमेश रेड्डी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.