Ankita Patil Sarkarnama
पुणे

Ankita Patil : अंकिता पाटलांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा आजच राजीनामा

Rajanand More

Pune News : भाजप नेते व माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील काही वेळातच पत्रकार परिषदेतून आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण त्याआधीच त्यांच्या कन्या व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देणार आहे.

अंकिता पाटील या भाजपच्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. या पदाचा त्या आजच राजीनामा देणार असल्याचे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. त्यांच्यासोबत इंदापूर तालुक्यातील युवा मोर्चाचे भाजपचे पदाधिकारीही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपला रामराम ठोकण्याचा त्यांचा आणि हर्षवर्धन पाटील यांना निर्णय पक्का असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्यासह अंकिता यांनी गुरूवारी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर ते तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अंकिता पाटील यांच्यासह त्यांचे बंधूंनी गुरूवारी काहीवेळी तुतारी हे चिन्हे व्हॉट्स अप स्टेटसला ठेवले होते.

इंदापूरमध्ये पाटलांकडून कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्यामध्येच हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची घोषणा करणार का, याबाबत उत्सुकता वाढली. ते आगामी विधानसा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहेत. मात्र, महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT