Sharad Pawar : मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? शरद पवारांनी सांगितला फाॅर्म्युला, म्हणाले, 'आरक्षणाची मर्यादा वाढवा पण इतरांना धक्का...'

Sharad Pawar Says Increase Quota Limit Without Hurting Others: सध्या 50 टक्क्यांच्यावर जाता येत नाही. आरक्षण हवे असेल तर 50 टक्क्याच्यावर जावे लागेल. पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती करावी लागेल. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? जावूया 75 टक्क्यांपर्यंत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न पेटले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. तर, धनगर समाजाकडून त्यांना एसटीमधून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू आहे.

जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांकडून तर धनगर समाजाला मागणीला आदिवासी नेत्यांकडून विरोध होता आहे. त्यामुळे तापलेला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांनी फाॅर्म्युला सांगितला आहे.

शरद पवार म्हणाले, सध्या 50 टक्क्यांच्यावर जाता येत नाही. आरक्षण हवे असेल तर 50 टक्क्याच्यावर जावे लागेल. पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती करावी लागेल. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? जावूया 75 टक्क्यांपर्यंत. तमिळनाडूत 78 टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे. तमिळनाडून शक्य झालंय ते महाराष्ट्रात का शक्य होणार नाही.

Sharad Pawar
Sharad Pawar: CM पदावरुन शरद पवार यांनी MVAच्या नेत्यांचे टोचले कान

'केंद्र सरकारने कायदेशीर दुरुस्ती करावी विधेयक आणावे आम्ही त्याला पाठींबा देऊ.पण हे करत असताना इतरांना जे मिळत त्याला धक्का लागू नये, अशी लोकांची चर्चा आहे. बघुया काय होतं ते', असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या या भूमिकेवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी कायदेशीरदृष्टा आरक्षणाची मर्यादा 50 टक्केच्यावर वाढवता येत नसल्याचे म्हटले आहे.

मराठी शाळांविषयी चिंता

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र, मराठी शाळांची संख्या घटत असल्याबद्दल पत्रकरांनी शरद पवारांनी विचारले. त्यावर शरद पवार म्हणाले, मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे.

शाळांमधील मुलांची संख्या कमी होतीये. असं चालू राहिले तर शाळा बंद होतील. शिक्षकांच्या नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.शिक्षणाच्या दृष्टिने मराठी भाषेच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे. त्यावर राज्यसरकारला स्वतंत्र बसावे लागले.

Sharad Pawar
Eknath Shinde Video : भाजप विरोधात शिवसेनेने दंड थोपटले? 100 जागा लढण्यावर एकनाथ शिंदे ठाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com