Chandrakant Patil On NCP's Banner Sarkarnama
पुणे

Indapur NCP News : इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले भाजपचे चंद्रकांत पाटील!

या बॅनरवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचेही फोटो आहेत.

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूरसाठी मंजूर झालेल्या विकास निधीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईत शुक्रवारी (ता. २४ मार्च) शहरात झळकलेले बॅनर सर्वांचेच लक्षवेधक ठरले. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकारी यांनी लावलेल्या बॅनरवर भारतीय जनता पक्षाचे नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो झळकल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. (BJP's Chandrakant Patil's photo on NCP's banner in Indapur)

इंदापूरमध्ये विकास निधी मंजुरीवरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये शहराच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या फोटोचे बॅनर लावत आभार मानण्यात आले आहेत. हे बॅनर शहरातील चौकाचौकांत लावण्यात आले आहेत.

या बॅनरवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचेही फोटो आहेत. एकंदरीत इंदापूरमध्ये आणलेल्या विकास निधीवरुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी विरुद्ध भाजपचे पदाधिकारी यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असताना या बॅनरने मात्र नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

चंद्रकांतदादांनी पक्षीय भेद केला नाही : गारटकर

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांनी विकास निधीच्या केलेल्या मागणीला पक्षीय भेद न करता मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणारे बॅनर शहरात लावले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT