Shivajirao Adhalrao, Mahesh Landge
Shivajirao Adhalrao, Mahesh Landge Sarkarnama
पुणे

Shirur and BJP : 'शिरूर'मध्ये भाजपचं ठरलं? लांडगेंचा दावा अन् मंत्र्याचे दौरे; आढळरावांची वाढली धाकधूक

सरकारनामा ब्यूरो

Mahesh Landge and Shivajirao Adhalrao : शिरूर आणि मावळ लोकसभेच्या जागा २०२४ ला आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार हे जवळपास नक्की झाले आहे. तर, युतीत या जागा शिवसेनेकडे (शिंदे) आहेत. मात्र, या जागांबाबत सर्वेक्षणात जो पक्ष विजयी होईल असे दिसेल, त्याला ती जागा सोडू, असे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. भाजपच्या या भूमिकेने शिवसेना व तेथील संभाव्य उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांचे टेन्शन पुन्हा वाढविले.

युतीच्या सर्वेक्षणात विजय होण्याची शक्यता असेल त्या (शिवसेना वा भाजप) पक्षाला संबंधित जागा सोडली जाईल, असे मोदी @ 9 मोहिमेच्या मावळ लोकसभेचे संयोजक माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegde) यांनी सांगितले. ते पिंपरीत (ता. ७) बोलत होते.

यावेळी भेगडे म्हणाले, "निवडणुकीपूर्वी भाजप प्रत्येक मतदारसंघाची पाहणी करतो. यावेळीही महाराष्ट्रात लोकसभेपूर्वी केली जाणार आहे. त्यात युतीतील जो पक्ष विजयी होईल असे दिसेल, त्याला ती जागा सोडू. त्यानुसार (BJP) भाजपही शिरूर किंवा मावळ या जागा लढवू शकते."

दरम्यान, मावळ (Maval) आणि शिरूर या दोन्ही ठिकाणी भाजपचे दौरे सुरू आहेत. शिरूमध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरु असल्याने तेथील शिवसेनेचे इच्छूक आढळराव अगोदरच तणावाखाली आलेले आहेत. त्यातच पिंपरी येथील भेगडे यांच्या वक्तव्याने शिवसेनेचे खासदार बारणे आणि माजी खासदार आढळराव पाटलांचे धाकधूक वाढली आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनीही शिरूर लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचा पुनरुच्चार केला. लांडगे म्हणाले, "भाजप हा जबाबदारी व आदेशाचे पालन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. गतवेळी २०१९ ला शिरूरमध्ये लढण्याची तयारी होती. पण, ही जागा शिवेसेनेला गेली. पक्षाने युतीचे काम करण्याची जबाबदारी टाकली आणि भोसरीतून सर्वाधिक लीड पक्षाच्या उमेदवाराला देऊन ती पार पाडली. आता जागावाटपात शिरूरची जागा भाजपकडे आली आणि तेथून पक्षाने उमेदवारी दिली तर पूर्ण ताकदीने लढून विजयी होऊ."

शिरूर (Shirur) येथून लढण्याची शिवसेनेचे आढळराव यांनी पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री भाजपचे प्रल्हाद पटेल यांनी ४ जून रोजी शिरूरचा दौरा केला. त्यावेळी खेडमध्ये बोलताना आमदार लांडगे यांनी जागावाटपात शिरूर भाजपकडे आले आणि तेथे पक्षाने संधी दिली, तर लढण्यास तयार असल्याचे प्रथमच सांगितले होते. त्यानंतर तीन दिवसांतच त्यांनी त्याचा पिंपरीत आज पुनरुच्चार केल्याने आढळरावांची बैचैनी नक्कीच वाढली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT