Ajit Pawar, Gopichand Padalkar  Sarkarnama
पुणे

Gopichand Padalkar On Ajit Pawar : ''एखादा विजय मिळाला म्हणून...''; पडळकरांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

Maharashtra Politics : अजित पवारांनी भाजपची चिंता करू नये.

सरकारनामा ब्यूरो

BJP Vs NCP News: राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीनं, एका जागेवर भाजप तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजय मिळविला आहे. या निवडणुकीत भाजपनं पारंपारिक मतदारसंघही गमावले. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही निवडणूक निकालावरुन भाजपवर निशाणा साधला होता. आता याच टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पडळकर म्हणाले, विधान परिषदांच्या निकालावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जाऊ नये. कारण कोकणात आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. आणि नागपूरच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे असंही पडळकर म्हणाले.

घोडा मैदान लांब नाहीये...

अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पडळकर म्हणाले, अजित पवारांकडे आता काहीच शिल्लक उरलेलं नाही. त्यांच्या घरातच वाद विकोपाला गेला आहे. लोकांचे प्रश्न सोडवायला त्यांना वेळ मिळत नाही. ते काय बोलतात त्याला फार महत्त्व नाही.

पवार अजून घोडा मैदान लांब नाहीये. विधानसभा, लोकसभा निवडणूक येत आहे. एखादा विजय मिळाला म्हणून हुरळून जाऊ नये. तसेच अजित पवारांनी भाजपची चिंता करू नये. राष्ट्रवादीची चिंता करावी. राष्ट्रवादी सांभाळायचं बघा असाही उपरोधिक टोलाही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लगावला आहे.

सत्यजीत तांबे यांच्या नाशिक पदवीधर निवडणुकीतील विजयानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरही पडळकर यांनी महत्वपूर्ण केलं आहे. सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये घ्यायचा का तो माझा विषय नाही, वरिष्ठ त्याच्यावरती निर्णय घेतील असं त्यांनी यावेळी सांगितले.

आजच्या आंदोलनात काही क्लास चालक लोकांचा हस्तक्षेप

राज्य सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत नवीन अभ्यासक्रम हा २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या याच निर्णयाविरोधात पुन्हा एकदा विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून नवीन अभ्यासक्रम हा याचवर्षीपासून नवीन अभ्यासक्रम लागू करावा या मागणीसाठी आंदोलन छेडलं आहे.

यावर पडळकर म्हणाले, एमपीएससीच्या बाबतीत 80 ते 90 टक्के विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की, 2025 पासून नवीन पॅटर्न लागू करावा. सरकारने त्याबाबतीत सकारात्मक भूमिका घेत निर्णय घेतला होता.आजच्या आंदोलनकर्त्या एमपीएससी विद्यार्थ्यांनी मला संपर्क केला नाही. आजच्या आंदोलनात काही क्लास चालक लोकांचा हस्तक्षेप दिसत आहे असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT