Ajit Pawar News : '' सत्यजीत तांबेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांनी...''; अजित पवारांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार आहे. मात्र...
Satyajeet Tambe , Ajit Pawar
Satyajeet Tambe , Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar On Satyajeet Tambe News : अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील लढतीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. आता तांबे यांच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.यामुळे आधीपासून सुरु असलेल्या तांबे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. मात्र, याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Satyajeet Tambe , Ajit Pawar
Marathi Sahitya Sanmelan : साहित्य संमेलनाला गालबोट; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ

अजित पवार (Ajit Pawar) यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्ला मुलाखतीत विविध मुद्दयांवर भाष्य केलं आहे. पवारांनी सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरुन रंगलेल्या राजकारणावर देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार म्हणाले, काँग्रेसने सत्यजीतच्या वडिलांना उमेदवारी द्यायचं ठरवलं होतं.

मात्र, सत्यजितने देखील चांगलं काम केलं असून तो सुध्दा एक चांगला सहकारी,राजकीय व्यक्ती बनू शकतो. महाराष्ट्राचा अभ्यास करण्याची त्याची तयारी सुध्दा आहे. त्याला उमेदवारी दिली असती तर काही बिघडलं नसतं आणि पुढचा घटनाक्रम टाळता आला असता असेही पवार म्हणाले.

त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे असंही पवार यावेळी म्हणाले.

Satyajeet Tambe , Ajit Pawar
Nashik Graduate Election : तांबेंकडून पराभूत झालेल्या शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाल्या.."ही मतं विकली.."

तसेच शरद पवारसाहेबांनी खर्गेंना फोन करून सांगितलं होतं की, सत्यजित तांबे (Satyajeet Patil) ला उमेदवारी द्या असा खळबळजनक दावा केला आहे. पण काँग्रेसनं त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली असे अजित पवार म्हणाले आहे.

यावेळी त्यांनी सत्यजितचे वडील त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. त्याचा तीन पिढ्या काँग्रेस विचारांच्या आहेत. तो युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता. त्यामुळे काँग्रेसने फार ताणू नये. मोठेपणा दाखवावा. सत्यजितने पण ताणून न धरता मधल्या एक वर्षाचा काळ विसरून जावा आणि काँगेसचं काम करावं असा सल्लाही पवार यांनी यावेळी सांगितले.

Satyajeet Tambe , Ajit Pawar
Amravati Graduate Election Result : भाजपला तिसरा पराभवाचा धक्का; अमरावतीत धीरज लिंगाडेंच्या गळ्यात विजयाची माळ

इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार आहे. मात्र, सत्यजीतला पुढे त्यांचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा असं अजित पवार म्हणाले.

त्यानं काँग्रेसच्या बरोबर जावं, बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे हे घरातले मोठे नेते आहेत. ते सांगतील ते त्यानं ऐकावं. याउपर काय करायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे असंही रोखठोक मत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com