Girish Bapat Big Announcement : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत भाजपसह आघाडीचीही प्रतिष्ठापणाला लागली आहे. दोन्ही बाजूने प्रचारासाठी स्टार प्रचाराकांची फौज मैदानात उतरवली आहे. याचदरम्यान, आता पुण्यातून भाजपची धाकधूक वाढविणारी बातमी समोर येत आहे.
पुण्याचे खासदार आणि कसबा मतदारसंघात पाचवेळा आमदार राहिलेले गिरीश बापट(Girish Bapat) यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबतची माहिती बापट यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापटांची प्रकृती ठीक नाही. यामुळे प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच खासदार गिरीश बापटांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यावेळी कसब्याचं टेन्शन घेऊ नका नक्की आपणच जिंकू असा विश्वास बापटांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला होता. मात्र त्यानंतर दोनच दिवसांत बापटांनी कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्यासोबत 40 स्टार प्रचारकांची फौज तयार केली आहे. त्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची नावं आहे. यामुळे प्रचाराची रणधुमाळी जोमात असताना ऐनवेळी कसब्याचे किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या गिरीश बापटांनी घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरत आहे.
पुण्यातील कसबा मतदारसंघावर मागील अनेक वर्ष सत्ता गाजवणारे गिरीश बापट प्रचारात सहभागी होणार नसल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुण्याचे खासदार आणि कसबा मतदार संघात पाचवेळा आमदार राहिलेले ते कसबा मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बापटांना चांगला माहिती आहे. त्यांचा इथे दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे बापट यांनी लक्ष घातले तर रवींद्र धंगेकरांसाठी ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.
...म्हणून मतदारसंघात प्रचार करू शकणार नाही!
प्रसिध्द केलेल्या पत्रकात गिरीश बापट म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाली आहे. गेले 3 महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूप कमी काम केले असून तरीसुद्धा मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे.
त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही असंही बापटांनी सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.