Pune Income tax Raid : पुण्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकांवर आठ जणांवर आज (बुधवारी) आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. आयकर विभागाचे अधिकारी या आठही ठिकाणी कागदपत्रांची कसून तपासणी करीत आहे.
पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे (Anirudh Deshpande) यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी केली असल्याचे समजते. त्यांच्या कार्यालय व घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती आहे.
सिटी कॉर्पोरेशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे संशय आयकर विभागाला आहे, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील मोठ बांधकाम उद्योजक म्हणून देशपांडे यांची ओळख आहे. या छापेमारीमुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.
सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आणि हडपसर येथील अमनोरा पार्कचे देशपांडे हे सर्वेसर्वा आहेत.त्याचे घर व कार्यालयावर आज सकाळपासून आयकर विभागाचे छापा टाकला असून कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. देशपांडे हे काही राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.
पुण्यात आयकर विभागाकडून (Income Tax) पुण्यात सहा ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यामध्ये सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांचा समावेश आहे. अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे उद्योजक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.