Nana Patole, Devendra Fadnavis  Sarkarnama
पुणे

Nana Patole News : भाजपचा कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पटोलेंनी धुडकावला; म्हणाले...

Congress News : देवेंद्र फडणवीस हे राजकारणासाठी काहीही बोलतात...

सरकारनामा ब्यूरो

Kasba By Election News : मुक्ता टिळकांच्या निधनानंतर आता कसबा पेठ आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुका भाजपकडून बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा निवडणूका बिनविरोध करणेच उचित होईल असं विधान केलं होतं.

पण आता महाविकास आघाडीकडून कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रस्ताव धुडकावला आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, महाविकास आघाडीची कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणुकी संदर्भात दोन तारखेला अधिकृत बैठक होणार आहे. कुठली जागा कोण लढणार याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. चर्चा करून अंतिम निर्णय केला जाणार आहे.

तसेच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. त्यावरून पटोले यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राजकारणासाठी काहीही बोलतात. आता निवडणुकीच्या तोंडावरती जुनी पेन्शन योजनेसंदर्भात भुलभुलैय्या दाखवायचा प्रयत्न करत आहेत. गेली नऊ वर्षे त्यांनी का प्रयत्न केले नाही, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही अशी टीकाही नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, अहमदनगर काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त केलेली आहे.जिल्हाध्यक्षाने स्वतःहून राजीनामा दिलेला नाही. तर आम्ही त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे. कारण त्यांनी बंडखोर सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe) यांना पाठिंबा दिला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत अखेर युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. मात्र, त्यांनी महाविकास आघाडीत आंबेडकरांना सामील करण्यावरुन मतभेद असल्याचीही चर्चा आहे. याचदरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्याकडे अजून आंबेडकरांना महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शरद पवार हे आजही भाजपसोबतच आहे असं खळबळजनक विधान केलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र यावर पटोले म्हणाले, पहाटेच्या शपथविधी संदर्भात मला काही बोलायचं नाहीय. त्यावेळी जे झालं ते चूक होती हे मात्र खरं आहे.पहाटेचा शपथविधी झाला ,काय झालं त्यांना माहीत असं विधान करत अधिक भाष्य करणं टाळलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT