Pune News: पुण्यातील हडपसर परिसरात आज मोठी खळबळ उडाली, जेव्हा कामधेनु इस्टेटच्या पार्किंगसमोरील एका सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक अर्थात बीडीएस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉस्पिटलमधील एका टॉयलेटमध्ये ही संशयास्पद वस्तू आढळली होती. त्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले.बीडीएस पथकाने तब्बल सात तास या संशयास्पद वस्तूची तपासणी आणि सुरक्षित हाताळणी केली. त्यानंतर ही वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही वस्तू नेमकी बॉम्ब होती की इतर काही धोकादायक साहित्य, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, इतक्या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा यंत्रणा कितपत सक्षम आहे, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हॉस्पिटलमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि नागरिकांची ये-जा असते. अशा ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही वस्तू नेमकी कोणी ठेवली? एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाने हे कृत्य केले का? की आर्थिक व्यवहार, बिल किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला? अशा विविध चर्चांना आणि अफवांना आता परिसरात उधाण आले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणा सीसीटीव्ही फुटेज, हॉस्पिटलमधील ये-जा करणाऱ्या व्यक्तींची माहिती आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत… नेमकं हे कृत्य कोणी केलं? रुग्णाच्या नातेवाईकाचा राग, बिलाचा वाद की इतर कोणतं कारण? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत…”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.