Pune News Sarkarnama
पुणे

Pune ATS News: बॉम्बस्फोटाची चाचणी, संवदेनशील स्थळांचे चित्रीकरण; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांची धक्कादायक माहिती उघड

सरकारनामा ब्यूरो

Pune Police News: हनीट्रॅपमध्ये अडकलेले DRDO चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. पुणे पोलिसांनी पकडलेल्या या दोन दहशतवाद्यांबद्दल एटीएसच्या (ATS) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एटीएस'ने कोर्टात दाखल केलेल्या अहवालानुसार, या दोघांनीही पुणे आणि पुण्याजवळच्या परिसरातील निर्जनस्थळी बॉम्बस्फोटाची प्रॅक्टिस केली होती. या दोघांनीही पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती आहे. मंगळवारी पुण्यातील सत्र न्यायालयात न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली.

याशिवाय, कोंढवा परिसरात मध्यरात्री गस्तीवर असताना संशयास्पद हालचाली जाणवल्याने दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी या दोघांना ताब्यात घेतले. पण यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.

एटीएस'ने दिलेल्या अहवालानुसार, पोलिसांनी मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांना हटकले आणि त्यांची चौकशी केली. पोलिसांनी ट्रु कॉलरच्या सहाय्याने फोन लावून पाहिला असता त्यांची वेगळीच नावे समोर आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कोंढव्यातील घरी जाऊन झाडाझडती घेतली असता इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याचं आढळून आलं.त्यांच्याकडे देशाचे नकाशे आणि इतर साहित्यही आढळून आलं. गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कोंढव्यात वास्तव्यास होते.

धक्कादायक म्हणजे या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूरमध्येही घातपाताचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांच्या शोधात होती. त्याचबरोबक त्यांच्याकडील ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केलं आहे. यात शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचंही एटीएसला तपासात आढळू आलं आहे. यासोबतच जी विध्वंसक कारवायांसाठी वापरली जाणारी केमिकल पावडर जप्त करण्यात आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT