Brijbhushan Singh Raj Thackeray
Brijbhushan Singh Raj Thackeray Sarkarnama
पुणे

राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही म्हणणारे, बृजभूषण सिंह पुण्यात येणार : मनसेची भूमिका काय?

Chetan Zadpe

Brijbhushan Singh : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी कडाडून विरोध केला होता. आता सिंग यांचा लवकरच पुणे दौरा होत आहे. मात्र सिंग यांना विरोध करणार नाही, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले. मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सिंग यांच्या दौऱ्याला मनसेकडून विरोध केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांनी जून महिन्यात अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी आक्रमक भूमिका घेऊन राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. मनसे आणि राज ठाकरेंकडून नेहमीच उत्तर भारतीयांचा अपमान झाला, उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात मारहाण केली गेली.त्यामुळे उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाया ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातत्यांनी आंदोलनाची तयारीही केली होती.

सिंग यांनी विरोध केल्यानंतर राज ठाकरेंनी प्रकृती अस्वास्थाचे कारण देत, अयोध्या दौरा रद्द केला होता. यावेळी ब्रिजभूषण सिंग आणि मनसेमध्ये शाब्दिक चकमक घडून आले होते. ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येतील तेव्हा बघून घेऊ, असे आव्हान मनसेकडून देण्यात आले होते. पुण्यात २० ते २५ डिसेंबर या कालाधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्प प्रतिष्ठाण याचे आयोजन करणार आहे. सिंह हे मागील दहावर्षांपासून राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. यामुळे ते या कुस्ती कार्यक्रमासाठी पुण्यात येत आहेत.मात्र आता सिंग यांना मनसे विरोध करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता सिंह यांच्या दौऱ्याला मनसेकडून विरोध होईल असे बोलले जात होते. मात्र सध्यातरी सिंह यांच्या दौऱ्याला मनसेकडून विरोध केला जाणार नाही, असे झाले आहे. मनसेने विरोध न करण्याची भूमिका का घेतली? अशा चर्चा होताना दिसत आहेत.

राज ठाकरेंचे भाजप नेत्यांशी सातत्याने होणाऱ्या भेटी, भाजप बरोबर वाढलेली जवळीक, भविष्यात भाजप बरोबर युतीची शक्यता आणि भाजपची नाराजी न ओढवून घेण्याचा मुद्दा, यामुळे मनसेने आपली आक्रमक भूमिका गुंडाळून ठेवली का? अशा चर्चांना उधाण येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT