Pune Grampanchayat Election : पुणे जिल्ह्यातील एकूण २२१ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्यापासून ते अर्जांची छाननी व इतर या निवडणुकीसंबंधीची कार्यवाही पार पडत आहे. १८ डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबरला सकाळी मतमोजणीला सुरूवात होऊन, निकाल जाहीर होणा आहे. पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील २२१ ग्रामपंचायतींच्या ७३१ सदस्य पदांसाठी आणि सरपंचपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतींच्या ७३१ सदस्यपदासाठी एकूण ५०३५ उमेदवारांनी ५०७८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर ४८ अर्ज बाद झाले. एकूण ५००४ वैध उमेदवारांचे ५०३० उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान १९७१ उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज मागे घेतले. त्यामुळे ३०३३ उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानात आहेत. यात विशेष गोष्ट सरपंचपदासाठी १०३५ उमेदवारांनी, १०४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती यातील १२ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले असून, ४६३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेले आहे. सरपंचपदासाठी आता ५६० उमेदवार इच्छुक आहेत.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात २८, भोरमधील ५४, दौंड ८, बारामती १३, इंदापूर २६, जुन्नर १७, आंबेगाव २१, खेड २३, शिरूर ४, मावळ ९, मुळशी ११ आणि हवेली तालुक्यातील ७ अशा एकूण १२ तालुक्यांतील एकूण २२१ ग्रामपंचायतींची निवडणुकींचा कार्यक्रम पार पडणार आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.