Pune : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.याचदरम्यान, पुणे पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना दुचाकी चोरांना बेड्या ठोकल्या. पण खाकी वर्दीचा हिसका दाखवल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. ते दुचाकीचोर 'मोस्ट वॉन्टेड' आणि 'एनआयए'च्या रडारवर असलेले दहशतवादी असल्याचं समोर आलं आहे. दोन पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेमुळे पुणे पोलिसांना दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं.
कोथरूड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पेट्रोलिंग पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस अमलदार अमोल नझन हे बुधवारी(ता.१९)पहाटे गस्त घालत होते. याचवेळी त्यांना तिघेजण दुचाकी चोरताना आढळले. त्यानंतर या दोघांनी थरारक पाठलाग करत त्या दुचाकीचोरांना बेड्या ठोकल्या. मोहमद युनुस साकी व इम्रान खान असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही मोस्ट वॉन्टेड आणि 'एनआयए(NIA)'च्या रडारवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे दोघे जण राजस्थानमध्ये मोस्ट वाँटेड असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तसेच ते देशविघातक कृत्यात गुंतलेले असून एनआयएचे पाच लाखांचे बक्षीसही त्यांच्यावर आहे. त्यांना पकडण्यात कोथरूड पोलीस ठाण्यातील प्रदीप चव्हाण आणि पोलीस अंमलदार अमोल नजन यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे पुणे पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे. तसेच या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी कौतुकाचा विषय ठरत आहे. (Pune Police)
नेमकं काय घडलं..?
कोथरूड(Kothrud) पोलीस ठाण्याच्या पथकाने दुचाकीचोरीच्या संशय आल्यानं तिघाजणांना विचारणा केली. मात्र, त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्या दरम्यान त्यांच्याकडे एक लॅपटॉप, चार मोबाईल तसेच बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.