Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Demand Governor: बेजबाबदार सरकारला भानावर आणा; धंगेकरांनी केली राज्यपालांकडे मागणी!

Chaitanya Machale

Pune News : वाढती महागाई, बेरोजगारी तसेच दुष्काळ यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता राज्य सरकारच्या कारभाराने अक्षरशः हैराण झाली आहे. सध्याची राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेली चिखलफेक यामुळे नागरिकांचा राजकरणावरचा विश्वास उडत चालला आहे.

राज्यात अनेक भागात सध्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. आतापासूनच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. जनावरांना चाऱ्याची चणचण जाणवत आहे. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा दुष्काळाच्या गंभीर काळात सरकार कुठं आहे? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले आहे. राज्य सरकारने अद्याप कोणतीही मदत दुष्काळग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना केलेली नाही. Ravindra Dhangekar Demand Governor

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात सत्ताधारी असलेले शिंदे - फडणवीस - पवार सरकार केवळ पक्ष फोडण्यात अडकले आहे. कट - कारस्थान करून काँग्रेसचे आमदार पक्षात घेण्यात भाजपचे नेते गुंतले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या जाहीर सभा घेण्यात आणि आपला वाढदिवस साजरा करण्यात रमले आहेत. या सर्व राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनता मात्र वाऱ्यावर सोडली आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

वाढती महागाई, दुष्काळ, आरक्षण (Reservation) याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला भानावर आणण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी धंगेकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांना पत्र पाठविले असून, आपल्या अधिकारात मनमानी कारभार करत जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Ravindra Dhangekar Demand Governor

...अन्यथा जनताच भानावर आणेल

राज्यात मराठा ओबीसी समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यावर ठोस भूमिका घेतली जात नसल्याने दोन्ही समाजात तेढ निर्माण होत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. यावर राज्यपाल म्हणून आपण आपली जबाबदारी पार न पाडल्यास निवडणुकीत जनताच या सरकारला भानावर आणेल, असेही धंगेकर म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT