Budhwar Peth as 700 officers conduct a late-night crackdown operation in Pune. Sarkarnama
पुणे

Budhwar Peth Raid : 700 पोलिसांसह बुधवार पेठेत छापा! पण पहिला डाव फसला पोलिसांनी केली बांगलादेशींवर 'काउंटर स्ट्राईक'?

Budhwar Peth police raid news : पुण्यातील बुधवार पेठेत 700 पोलिसांसह मोठा छापा टाकण्यात आला. पहिला डाव फसल्यानंतर पोलिसांनी संशयित बांगलादेशी नागरिकांवर काउंटर स्ट्राइक कारवाई केली असल्याची माहिती.

Sudesh Mitkar

Pune News : गेल्या काही दिवसांपासून बुधवार पेठ परिसरामध्ये पोलीसांकडून सातत्याने झाडाझडती घेतली जात आहे. पोलिसांकडून बुधवार पेठ परिसरातील अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू असून सातत्याने छापे या परिसरात पोलिसांकडून टाकण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच छापा मंगळवारी सायंकाळी पोलिसांकडून टाकण्यात आला त्यामध्ये 11 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं आहे.

यापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठ परिसरातील डिस्को बिल्डींगवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये 10 बांगलादेशी नागरिक सापडले होते. त्यामुळे बुधवार पेठचा बांगलादेश पॅटर्न समोर आला होता. त्यानंतर याची पटर्नची दखल घेत पोलिसांनी गेल्या आठवड्यामध्ये तब्बल सातशे पोलीस कर्मचाऱ्यांसह बुधवार पेठ परिसरामध्ये कोबिंग ऑपरेशन केलं. एवढं मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवून देखील पोलिसांच्या हाती फक्त दोन बांगलादेशी नागरिक लागले असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे एवढा मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवून देखील बांगलादेशी पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे चर्चा सुरू होती.

पोलिसांकडून अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची कुनकून आधीच या परिसरातील बांगलादेशी नागरिकांना लागल्याने त्यांनी पोलिसांचा छापा पडण्यापूर्वीच तिथून काढता पाय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलिसांना एवढ्या मोठ्या छाप्यानंतर काल रात्री अचानकपणे पुन्हा एकदा बुधवार पेठ परिसरामध्ये बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतला आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मी सुरुवातीला म्हणालो होतो. बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली आहेत, त्यावर कारवाई केली जाणार सांगितले होते. त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा कारवाई केली. काल रात्री कारवाई करण्यात आली यात ११ बांगलादेशी महिला सापडल्या आहेत.

कालच्या कारवाई मध्ये एकूण २२ महिला आम्ही ताब्यात घेतल्या होत्या. त्यातील सहा महिलांनी आपण बांगलादेशी असल्याचे कबूल केलं तर इतर पाच महिलांची कागदपत्र पडताळल्यानंतर त्या बांगलादेशी असल्याचं समोर आलं आहे. बुधवार पेठ परिसरात अशा हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. जे जे बेकायदेशीर आहे, सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. गरज पडल्यास आणखी जोरदार कारवाई करणार असून बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे असं पोलीस आयुक्त म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT