State Election Commission
State Election Commission Sarkarnama
पुणे

Gram Panchayat By Election : जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींचा गुलाल मे महिन्यात उधळणार !

सरकारनामा ब्युरो

Pune By Election : पुणे जिल्ह्यातील १९५ गावांची पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ही पोटनिवडणूक येत्या १८ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील १० गावचे सरपंच आणि १९५ गावांचे एकूण २८० सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच, संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.

या पोटनिवडणुकीत (By Election) थेट जनतेतून सरपंच निवडले जाणार आहेत. यात आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे तर्फे घोडा, नांदूर, भोरमधील करंजे, वाढाणे, कोळवडी व आशिंपी, दौंडचे पाटेठाण, जुन्नरमधील वाणेवाडी आणि मुळशी तालुक्यातील पाथरशेत व निवे या दहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या २५ एप्रिल ते २ मे या काळात सुटीचे दिवस वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम

- उमेदवारी अर्ज दाखल करणे - २५ एप्रिल ते २ मे (सुट्टीचे दिवस वगळून)

- प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी - ३ मे (सकाळी ११ वाजल्यापासून)

- उमेदवारी अर्ज माघार घेणे - ८ मे (दुपारी तीन वाजेपर्यंत)

- निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी - ८ मे (दुपारी तीनच्या पुढे)

- निवडणूक चिन्हांचे वाटप - ८ मे (अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर)

- मतदान - १८ मे २०२३

- मतदानाची वेळ - सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

- मतमोजणी व निकाल - १९ मे २०२३.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT