Threaten of Murder CM : मुख्यमंत्र्यांना उडविण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पुण्यातून अटक

Police Arrest Person from Pune : दारुच्या नशेत कृत्य केल्याची कबुली
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune Police News : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडविणार’ अशी धमकीचा फोन सोमवारी (ता. १०) पुणे पोलीस नियंत्रण कक्षात आला होती. त्यानंतर गतीने तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी धमकी देणाऱ्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दारुच्या नशेत धमकी दिल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, या फोनमुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.

Crime News
Beed Politics : पंकजा-धनंजय मुंडेंच्या नात्यातील कडवटपणा संपला; एकत्र येण्याचे दिले संकेत

राजेश मारुती आगवणे (वय ४२) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा पुणे जिल्ह्यामधील बारामती (Baramati) तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रहिवासी आहे. सध्या तो मुंबईतील शास्त्रीनगर येथे राहतो. तर त्यांची पत्नी पुणे येथे नोकरीस आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षात ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उडविणार’ अशा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर फोन करणाऱ्याची माहिती काढली. त्यावेळी त्याचे लोकेशन पुण्यातील कॅनॉल रोड, रामनगर येथे दाखवत होते.

Crime News
Babri Masjid : चंद्रकांतदादा नीट माहिती घ्या; बाबरी पाडायला शिवसैनिकच होते; 'यूपी'तील शिवसेना नेत्याचा दावा

दरम्यान, मोबाईल कंपनीला ई-मेल करून अधिकाऱ्याशी संपर्क साधला. तांत्रिक विश्लेषणाव्दारे त्याच्या घरचा पत्ता इतर माहिती मिळविली. त्यावेळी तो पुण्यातील आकाशनगर, वारजे येथे असल्याची माहिती मिळाली. तो पुण्यात नोकरी करणाऱ्या पत्नीला भेटण्यास आला होता. त्यावेळी त्याने नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर धमकीचा कॉल केला. त्याच्याविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Karnataka Assembly Election : काँग्रेस-भाजपचे संभाव्य बंडखोर देवेगौडांच्या गळाला; दोघांनी घेतली कुमारस्वामींची भेट

आरोपी आगवणे मुंबईत एका रुग्णालयात वॉर्डबॉय आहे. पत्नीला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. सोमवारी रात्री तो भरपूर दारू घेतली होती. त्याचा त्याला त्रास झाला. त्यामुळे त्याने रुग्णवाहिकेसाठी दूरध्वनी केला. परंतु त्याला दुसऱ्या क्रमांकावर फोन करा, असे सांगण्यात आले. त्यावर त्याने दारूच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून मुख्यमंत्र्यांनाच उडविण्याचा दूरध्वनी केला. आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com