पिंपरी : नोंदणी न करता क्लिनिक चालवून मान्यताप्राप्त गर्भपात सेंटरप्रमाणे गर्भपाताच्या गोळ्या एक महिला डॉक्टर (doctor) पिंपरी चिंचवडमधील भोसरीत (Bhosari)देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेकडे आलेल्या तक्रारीवरून पालिकेच्या वैद्यकीय विभागाने या दवाखान्यावर छापा टाकली असता हा प्रकार ४ तारखेला उजेडात आला. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात वैद्यकीय गर्भावस्था समाप्ती कायदा,१९७१ नुसार गुरुवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला.
शनि मंदिराजवळ,गव्हाणेवस्ती, भोसरी येथील शीतल क्लिनिकमध्ये हा गैरप्रकार सुरु होता.याबाबत पालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे (वय ५७,रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार डॉ.शीतल प्रशांत येवले-बोऱ्हाडे (रा.शनि मंदिराजवळ,गव्हाणेवस्ती,भोसरी)यांच्याविरुद्ध वरील कायदा तसेच भादंवि कलम १८८ नुसारही गुन्हा गुरुवारी नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्यात दोन ते सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे. त्यातील आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचे भोसरी पोलिस ठाण्यचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांनी सरकारनामाला सांगितले.घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिली.
४ तारखेला पालिकेच्या पथकाने शीतल क्लिनीकवर छापला टाकला. मात्र, पालिकेच्या सबंधित कमिटीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत पोलिस कारवाईचा निर्णय झाल्यावर तक्रार देण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास सहा दिवसांचा विलंब झाला. मात्र,तक्रार येताच लगेचच गुन्हा दाखल केल्याचे सिनिअर पीआय जाधव यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. बोऱ्हाडे या नोंदणी न करता त्यांचा दवाखाना चालवित असल्याचे आढळून आले. तसेच गर्भपात सेवा देण्याकरिता त्यांनी महापालिका वा राज्य शासनाची कसलीही परवानगी घेतली नव्हती. शासकीय आदेश व नियमांचे पालन न करता गर्भपाताच्या गोळ्या जवळ बाळगून या डॉक्टर त्या रुग्णांना देत असल्याचे दिसून आले. एपीआय़ घाडगे या गु्न्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.