लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण थांबवा : हृदयनाथ मंगेशकर

लता मंगेशकर संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आह़े या संगीत स्मारकापेक्षा अन्य मोठे स्मारक होऊ शकत नाही,'' असे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे सहा फेब्रुवारी रोजी निधन झाले. दादरच्या (Dadar)ज्या शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याठिकाणी लता मंगेशकर याचं स्मारक व्हावं, अशी मागणी भाजपचे नेते, आमदार राम कदम (Ram Kadam)यांनी केली होती.

यावर मंगेशकर कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे. लतादीदींचं स्मारक शिवाजीपार्कवर व्हावं की नको, यावर लतादीदींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar)यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सोडलं मौन सोडलं.

हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ''शिवाजी पार्क हे क्रीडा उद्यान आहे, या उद्यानात लतादीदींचं स्मारक होऊ नये, महाराष्ट्र सरकार लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या रुपाने जे करतंय, तेच खरं स्मारक आहे, लतादीदी या साक्षात श्रद्धामूर्ती असल्याने संगीताची श्रद्धा वाहणं महत्त्वाचं आहे,"

''लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून निर्थक वाद सुरू आह़े हा वाद, राजकारण थांबवा़ लता मंगेशकर संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आह़े या संगीत स्मारकापेक्षा अन्य मोठे स्मारक होऊ शकत नाही,'' असे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मंगेशकर कुटुंबियांची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. ''लता मंगेशकर यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. अनेक गंगा जरी ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. या वादात मंगेशकर कुटुंबीय कधीच सहभागी झाले नाही. कारण तशी मंगेशकर कुटुंबीयांची इच्छाच नाही. या बाबतीत सुरू असलेले राजकारण बंद करावे,''अशी विनंती हृदयनाथ मंगेशकर यांनी केली.

Lata Mangeshkar
शिवसेनेत माझी 'लेव्हल' दानवेंपेक्षा वरचढ ; खैरेंनी डिवचलं

लता मंगेशकर यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयावर मंगेशकर कुटुबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

सुहास पेडणकर यांनी घेतलेल्या परस्पर निर्णयावर मंगेशकर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करत पत्र पाठवले आहे. मंगेशकर कुटुंबीयांना विश्वासात न घेता निर्णय घेऊ नये, असे पेडणेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबई विद्यापीठाने समितीने सुचवलेली जागा लतादीदींच्या हयातीत उपलब्ध करून न दिल्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांचे स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही, याचा खेद वाटत असल्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी या पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com