General Motors Company News  Sarkarnama
पुणे

Sushma Andhare News : सुषमा अंधारेंनी फडणवीसांना करून दिली 'त्या' पत्राची आठवण; जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय...

General Motors Company News : देवेंद्रजींनी हा प्रश्न आता मार्गी लावला पाहिजे.

Mangesh Mahale

Pune : देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लिहिलेल्या पत्राची आठवण ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करून दिली. "आता फडणवीस सत्तेत आहेत, त्यांनी या कामगारांचा प्रश्न निकाली लावावा," अशी मागणी अंधारेंनी केली. जनरल मोटर्सच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी त्या आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या.

"तीन वर्षांपासून या कामगारांचा संघर्ष सुरू आहे. सातत्याने हे कामगार रस्त्यावर येत आहेत. या कामगारांविषयी फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे पत्र लिहिले होते. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने देवेंद्रजींनी हा प्रश्न आता मार्गी लावला पाहिजे," असे अंधारे म्हणाल्या.

"पालकमंत्री अजित पवारांना आमची विनंती आहे की, या प्रश्नावर पक्षीय राजकारण, श्रेयवाद न आणता या सुमारे साडेतीन हजार कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा येत्या बारा तारखेला आम्ही एमआयडीसीला कुलूप लावू," असा इशारा अंधारे यांनी सरकारला दिला.

तळेगाव एमआयडीसीत नवीन येणाऱ्या ह्युंदाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहीत नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात, कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्या पाच हजार लोकांचा निर्माण झालेला जीवन मरणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय ह्युंदाई मोटर्सला सरकारने कोणतीही परवानगी देऊ नये आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मोटर्स कंपनीच्या सुमारे एक हजार कामगारांनी कुटुंबीयांसह बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT