Gulabrao Patil News :..मी हरलो तर तुमच्या घराजवळ फटाके फुटतील, असं गुलाबराव पाटील का म्हणाले?

Maharashtra Politics : गावातील लोकांना एक करा. समविचारींशी युती, गट करा...
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

Jalgaon : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावत कानपिचक्या दिल्या. "तुम्ही हरला तर पावती माझ्या नावावर फाटेल, पण मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील," असे ते म्हणाले. जळगावात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाला लागा," अशा सूचना गुलाबराव पाटलांनी दिल्या. "जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 25 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला पाहिजे. निवडणुकांमध्ये तुम्ही हरले तर त्याची पावती माझ्या नावावर फाटेल. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत जर मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील," अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला.

"गावातील लोकांना एक करा. समविचारींशी युती, गट करा. यासाठी आतापासूनच कामाला लागा. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका ताकदीने लढा," असा सल्ला त्यांनी दिला.

Gulabrao Patil
Dhananjay Munde News : पक्ष चोरीला जातोय, असं म्हणणं जयंत पाटलांचा केविलवाणा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. "साडेचार वर्षे देवकर पालकमंत्री होते. त्यांनी कधी हातात माईक घेतला नाही. डीपीडीसीच्या झालेल्या सर्व सभा एकनाथ खडसेंनी चालवल्या," असा हल्लाबोल पाटलांनी देवकरांवर केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी टीका केली होती. फडणवीसांचा उल्लेख त्यांनी 'मदारी' असा केला होता. गुलाबराव पाटलांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे. "संजय राऊत म्हणजे खराब झालेली कॅसेट आहे. तिला मी महत्त्व देत नाही," असे गुलाबराव जळगावात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Gulabrao Patil
Shambhuraj Desai News : एकही आमदार नसणाऱ्या आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांवरील विधान निंदनीय; शंभूराज देसाईंचा टोमणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com