पुणे : विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने टीका होते. सरकारमधील अनेक मंत्री व आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे, यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिकीया दिली आहे. पाटील म्हणाले, "सरकारमधील काहीजण नाराज आहेत, अशी चर्चा केली जाते, पण नाराजांना मनवायची व्यवस्था भाजप आणि शिंदे गटाकडे आहे." सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी विरोधकांडून सातत्याने होणाऱ्या सरकार पडणार या टीकेवरही प्रतिक्रीया दिली. "जयंत पाटील, नाना पटोले, अजित पवार हे सातत्याने ' हे सरकार पडेल ' याबाबत बोलत आहेत. पण 100 दिवस झाले तरी सरकार सुरळीत चालू आहे. सरकारमधील काहीजण नाराज आहेत, असे बोलले जाते. पण नाराजांना मनवायची व्यवस्था भाजप आणि शिंदे गटाकडे आहे, असे पाटील म्हणाले.
पुण्यात नुकताच जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्ते जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेले होते. पुणेकरांना पाण्यातून वाट काढत जावे लागले. अनेक दुचाकी वाहने पाण्यात वाहत होते. यामुळे मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे. यावरही पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "पावसाचे गणित कळत नाहीये. रस्त्यावरील पाणी वाहून घेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाऊस कमी वेळेत पडला, असे पाटील म्हणाले.
नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यात येतील. यंदाच्या पावसाचे गणित कळत नाहीये. रस्त्यावरील पाणी वाहून घेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाऊस काल कमी वेळेत पडला. परंतु याची चौकशी करण्यात येईल.जिल्ह्यातही पावसामुळे खूप नुकसान झाले आहे, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यां बोलेन, पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत, असे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.