Kasba-Chinchwad Election : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेसाठी मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी भाजपकडून जगताप आणि टिळक कुटुंबियातील व्यक्तिलाच उमेदवारी मिळेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. तर आता इतर उमेदवारांनीही भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत अजूनही सस्पेंस कायम असताना भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पाटील म्हणाले, "कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीबाबत भाजप तयारी करत आहे. आमच्या कार्यपद्धती प्रमाणे संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार झाली आहे. ती आमंही केंद्राकडे उद्या पाठवू, ३१ किंवा १ तारखेपर्यंत या यादीवर चर्चा होईल आणि दिल्लीतून नावे घोषित होतील."
दरम्यान, कसबा निवडणुकीमध्ये दिवंगत मुक्ता टिळक यांच्या पती शैलेश टिळक तर चिंचवडमध्ये दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा त्यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता आहे. मात्र आता जगताप आणि टिळक यांच्या कुटुंबाच्या बाहेरील इच्छुक उमेदवारांनी दावा केल्याने, उमेदवारांची यादी आता पक्षश्रेष्ठींसाठी पाठवण्यात आली आहेत.
पुढील आठवड्यात किंवा १ फेब्रुवारी पर्यंत दोन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर विरोधक व इतर पक्षांकडूनही उमेदवार निश्चित होऊन, पुढील रणनीतीही इतर पक्षांकडूनही आखण्यात येईल, असे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.