chandrakant patil  sarkarnama
पुणे

VIDEO : "भाजप त्याग करण्यास तयार, पण...", चंद्रकांतदादा पाटलांचं मोठं विधान

Akshay Sabale

Chandrakant Patil Latest News : भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्या महायुतीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची जुलै 2023 मध्ये 'एन्ट्री' झाली. या महायुतीनं 2024 ची लोकसभा निवडणूक एकत्र लढली. यावेळी अनेक जागांची तडतोड करण्यात आली. पण, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे. अजितदादांच्या 'एन्ट्री'मुळे शिंदे गट आणि भाजपमधील भावी आमदारांची गोची निर्माण झाली आहे.

याबद्दल प्रश्न विचारल्यावर मंत्री चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil ) यांनी दिलेल्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. "भाजप चार जागांचा त्याग करण्यास तयार आहे. मात्र, महायुतीचं सरकार आलं पाहिजे," असं चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

'अजितदादा ( Ajit Pawar ) महायुतीसोबत आल्यानं अनेक जागांवर अडचण निर्माण झाली आहे,' असा प्रश्न विचारल्यावर चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "वाजपेयी सरकारमध्ये भाजपसोबत 24 पक्ष होते. 2014 आणि 2019 मध्ये भाजपचं बहुमतावर सरकार निवडून आलं. पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खोट्या 'नॅरेटिव्ह'मुळे गडबड झाली. तरीही मोदींनी 'एनडीए'तील मित्रपक्षांना सोबत घेतलं. मंत्रिपदे दिली. ते मनाने उदार आहेत."

"वाजपेयी यांना 24 पक्षांना सोबत घ्यावं लागलं होतं. महाराष्ट्रात 1995 ते 1999 युतीचं सरकार असताना शिवसेना सोबत होती. सहयोगी पक्षांना सोबत घेतल्याशिवाय फार कुणाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे अजितदादा काय आणखी कुणी पक्ष सोबत यायला तयार असतील, तर चार जागांचा त्याग करण्यास भाजप तयार आहे. मात्र, बहुमताचं सरकार आणायचं आहे," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT